Credit Card Updates: क्रेडिट कार्डचं बिलिंग सायकल कसं बदलायचं? माहितीय का ही सीक्रेट ट्रिक

Last Updated:

क्रेडिट कार्ड वापरताना बिलिंग सायकल आणि पेमेंट तारखा समजून घेणे महत्त्वाचे आहे. बँका बिलिंग सायकल बदलण्याची परवानगी देतात, ज्यामुळे कॅश फ्लो मॅनेज करणे सोपे होते.

News18
News18
मुंबई: नोकरदार, व्यवसायिक असोत किंवा अगदी नव्याने नोकरीला लागलेले तरुण आजकाल क्रेडिट कार्ड किंवा बजाज फायनान्स कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण मोठे पेमेंट एकावेळी करु शकत नाहीत म्हणून क्रेडिट कार्डद्वारे थोडे थोडे पैसे देतात. काही जण क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असतात. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळणं सहज शक्य होता. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला अडचण येते ती बिलिंग सायकलची.
बऱ्याचदा असं होतं की बिल पेमेंट केल्यानंतर 15 दिवसांमध्ये पुन्हा बिल जनरेट होतं की काय असं वाटतं, मग अशावेळी आपल्याला आपलं बिल सायकल आणि पेमेंटची तारीख माहिती असायला हवी. तुम्हाला कुठल्या तारखेला पगार येतो किंवा पैसे मिळतात ती तारीख पाहा. बिलिंगची तारीख, पेमेंट करण्याची तारीख आणि पगाराची तारीख या तिन्हीचा ताळमेळ बसायला हवा. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या.
advertisement
क्रेडिट कार्डचं सायकल साधारण 30 दिवसांचं असतं. मागच्या स्टेटमेंटच्या तारखेपासून 30 दिवस धरले जातात. म्हणजे 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी असे 30 दिवस अशा प्रकारे धरलं जातं. तुमच्या बिल भरण्याची अंतिम तारीख साधारणपणे सायकल संपल्यानंतर सुमारे 20 दिवसांनी असेल. या तारखा नीट पाहिल्या तरच आपल्याला त्यातला फरक समजू शकतो. यामुळे तुमचे बिल तुमच्या उत्पन्नाच्या वेळेनुसार आणि इतर खर्चांशी कसे जुळते, हे समजून घेण्यास मदत होईल.
advertisement
तुमच्याकडे पैसे किती तारखेपर्यंत येतात त्यानुसार तुम्ही बिलिंगची तारीख बदलून घ्या. बहुतेक बँका तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल बदलण्याची परवानगी देतात. हे काम तुम्ही ग्राहक सेवा केंद्राशी बोलून किंवा तुमच्या ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सहज करू शकता. तुमच्या क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेला फोन करा आणि बिलिंग सायकल बदलण्याची विनंती करा. त्यांना समजावून सांगा की तुम्ही उत्तम कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी तुमच्या बिलिंग सायकलला तुमच्या पगाराच्या वेळेनुसार सेट करायचं आहे.
advertisement
काही बँका त्यांच्या मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारेही बिलिंग सायकल बदलण्याचा पर्याय देतात. यासाठी Manage Cards किंवा Billing Options यांसारखे पर्याय ऑनलाईन उपलब्ध करुन देतात. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बिलिंग सायकल बदलण्याची रिक्वेस्ट करुन शकता आणि त्यानुसार अपडेट करु शकता. बँकेकडून तुमची रिक्वेस्ट स्वीकारली गेल्यानंतर हा बदल होईल, तोपर्यंत पूर्वीसारखेच बिलिंग सायकल सुरू राहील. नवीन आणि जुन्या सायकलमध्ये कोणताही ओवरलॅप होणार नाही याची खात्री करा, नाहीतर त्यावर अतिरिक्त शुल्क लागण्याचा धोका असतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Credit Card Updates: क्रेडिट कार्डचं बिलिंग सायकल कसं बदलायचं? माहितीय का ही सीक्रेट ट्रिक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement