Economic And Fashion : स्कर्टची लांबी सांगते देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य, जितकी साईज लहान तेवढी....
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Fashion Predict Economy: देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आणि बळकट आहे अथवा कमकुवत झाली आहे, याचे दावे आकडेवारीने करतात. मात्र, सामान्य लोकांची खरेदी आणि फॅशनवरूनदेखील अर्थव्यवस्थेचा अंदाज लावण्यात येतो.
मुंबई: राजकीय नेते आणि अर्थतज्ज्ञ हे अर्थव्यवस्थेबाबत अनेकदा भाष्य करतात. देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आणि बळकट आहे अथवा कमकुवत झाली आहे, याचे दावे आकडेवारीने करतात. मात्र, सामान्य लोकांची खरेदी आणि फॅशनवरूनदेखील अर्थव्यवस्थेचा अंदाज लावण्यात येतो. शेअर बाजारात तेजी आल्यास महिला लहान आणि फॅशनेबल ड्रेस परिधान करत असल्याचा दावा केला जातो.
advertisement
फॅशन ट्रेंडमध्ये स्कर्टची लांबी किती आहे, याच्या अनुमानावरून देशाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाणार आहेत, याचा अंदाज वर्तवण्यात येतो. वर्ष 1926 मधील एक अर्थतज्ज्ञ जॉर्ज टेलर यांनी ही थेरी मांडली होती. या अंदाजाला Hemline Index असे म्हटले जाते. या थेरीनुसार, जर महिलांच्या स्कर्टची लांबी अधिक असल्यास अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोका असतो. जर स्कर्टची लांबी लहान असल्यास अर्थव्यवस्थेत तेजी येण्याचा अंदाज आहे. हा फॅशन ट्रेंड अर्थव्यवस्थेबाबत 3-4 वर्ष आधीच अंदाज सांगतो.
advertisement
80 टक्क्यापर्यंत योग्य अंदाज?
वर्ष 1920 ते 1960 पर्यंत, गुडघ्यापर्यंतचे स्कर्ट आणि नंतर मिनी स्कर्ट लोकप्रिय झाले. या काळात, अर्थव्यवस्थेत लक्षणीय भरभराट झाली. त्यानंतर 2005 मध्ये, जेव्हा लांब मॅक्सी ड्रेस लोकप्रिय झाले, तेव्हा काही वर्षांनी 2008 मध्ये मंदी आली. काही अर्थशास्त्रज्ञ अजूनही या सिद्धांताला गांभीर्याने घेतात. फॅशन ट्रेंडवरून वर्तवण्यात आलेला अंदाज हा 80 टक्के अचूक असल्याचे मानले जाते.
advertisement
हेमलाइन इंडेक्स ही केवळ एक मजेदार आणि मनोरंजक कथा आहे. त्याला अर्थव्यवस्थेचे सूचक मानणे पूर्णपणे अचूक नाही. स्कर्टची लांबी आणि फॅशन ट्रेंड केवळ लोक कसे वाटतात किंवा त्यांचा मूड कसा आहे हे दर्शवतात, पुढील बाजारातील हालचाली योग्य पद्धतीने वर्तवली जात नाही.
advertisement
लोकांची खरेदी आणि अर्थव्यवस्थेचा संबंध...
राजकारण आणि अर्थशास्त्रज्ञ देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काहीही म्हणत असले तरी, इतिहास दाखवतो की सामान्य लोकांची खरेदी आणि फॅशन देखील अर्थव्यवस्थेशी जोडलेली असते. जेव्हा शेअर बाजार वाढतो आणि लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतात तेव्हा महिलांचे कपडे लहान आणि अधिक फॅशनेबल बनतात. दरम्यान, आर्थिक मंदीच्या काळात, स्कर्ट आणि ड्रेसची लांबी - हेमलाइन्स - वाढण्याची शक्यता असते.
advertisement
पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीत घट होणे हे देखील अर्थव्यवस्था मंदावण्याचे संकेत देते. त्याचप्रमाणे, केस कापणे, पहिली डेट, लिपस्टिकची विक्री अशा काही गोष्टी देखील आर्थिक परिस्थितीबाबत भाष्य करते.
लहान फॅशन आणि खरेदी पद्धती देखील लोकांचे खिसे किती भरलेले किंवा रिकामे आहेत याचा अंदाज वर्तवू शकतात. याला "हेमलाइन इंडेक्स" म्हणतात. हा निर्देशांक अर्थव्यवस्था आणि फॅशनमधील एक आकर्षक संबंध प्रकट करते.
advertisement
लांबी आणि अर्थव्यवस्थेचा एक विश्वासार्ह संकेत?
हेमलाइन इंडेक्स, किंवा स्कर्टची लांबी आणि अर्थव्यवस्थेमधील मनोरंजक संबंधाबाबत नेहमीच चर्चा केली जाते. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की आर्थिक परिस्थिती लोकांच्या खरेदी आणि कपड्यांवर प्रभाव टाकू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की स्कर्टची लांबी शेअर बाजार किंवा अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत विश्वासार्ह संकेत देते.
अर्थव्यवस्थेबाबतची खरी माहिती आणि भवितव्याबाबतचा अंदाज हा नेहमीच डेटा आणि अहवालांमधून येते. कोणत्या फॅशन शोमधून येत नाही.
1930 च्या दशकात लांबी पुन्हा वाढली आणि 1940 च्या युद्धकाळात गुडघ्यापर्यंत मर्यादित होती. 1947 मध्ये लांब स्कर्ट दिसू लागले, जे 1949 च्या मंदीचे पूर्वसूचक होते. 1960 च्या दशकात मिनीस्कर्ट लोकप्रिय झाले, जे त्या काळातील तांत्रिक, सांस्कृतिक आणि तरुणाईची ऊर्जा प्रतिबिंबित करतात. परंतु हा सिद्धांत नेहमीच खरा ठरला नाही. 2008 च्या आर्थिक संकटादरम्यान हेमलाइन इंडेक्सने कोणतीही स्पष्टता दर्शवली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Economic And Fashion : स्कर्टची लांबी सांगते देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य, जितकी साईज लहान तेवढी....