Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज

Last Updated:

Gold Price Prediction : ता मागील काही दिवसात सोन्याच्या दराला झळाळी मिळाली आहे. सोन्याच्या दरात ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, त्याकडे एक्सपर्टने लक्ष वेधत १९७९ मधील घटनाक्रमांकडे लक्ष वेधले आहे.

सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
Gold Price News: सोन्याच्या दरात मागील काही दिवसांमध्ये चांगलीच उसळण आली आहे. सोन्याचा दर पुन्हा एकदा आपल्या उच्चांकी दर गाठणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. दिवाळीनंतरच्या काही दिवसात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. उच्चांकी दरापासून सोनं जवळपास १० हजारांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर आता मागील काही दिवसात सोन्याच्या दराला झळाळी मिळाली आहे. सोन्याच्या दरात ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, त्याकडे एक्सपर्टने लक्ष वेधत १९७९ मधील घटनाक्रमांकडे लक्ष वेधले आहे.
सोन्याच्या किमती सध्या एका ऐतिहासिक वळणावर आहेत. पाच आठवड्यांनंतर सोन्याचा दर प्रति औंस ४,२४० डॉलरवर पोहोचला आहे. ही एक ऐतिहासिक तेजी असल्याबाबत तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. मागील ५ आठवड्यातील दराचा हा मोठा स्तर आहे. एक्सपर्टनुसार, सोन्याचा दर ही १९७९ मधील परिस्थितीची पुनरावृत्ती करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

> १९७९ मध्ये काय झालं होतं?

advertisement
वर्ष १९७९-८० च्या दरम्यान काळ हा सोन्याच्या दराच्या तेजीचा महत्त्वाचा काळ समजला जातो. या काळात महागाईनेदेखील उच्चांक गाठला होता. व्याज दरात चढ-उतार दिसून आला. याच कालावधीत भू-राजकीय तणाव वाढीस राहिला होता. तर, डॉलरवर दबावही वाढला होता. या सगळ्या घडामोडींवर सोन्याने एका वर्षात जबरदस्त परतावा दिला. त्यानंतर आता ४५ वर्षानंतर पुन्हा तोच पॅटर्न दिसत असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
advertisement

>> ४५ वर्षानंतर पुन्हा तोच पॅटर्न दिसणार?

फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीची शक्यता 
सोन्याला सर्वात मोठी वाढ मिळाली. बाजाराने आधीच गृहीत धरले आहे की फेड या महिन्यात दर २५ बेसिस पॉइंट्सने व्याज दरात कपात करेल. कमी व्याजदर हा सोन्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळेच सोन्याचा दर झपाट्याने वाढला असून आता ४,२४० डॉलर प्रति औंसच्या जवळ पोहोचले.
advertisement
कमकुवत यूएस डेटा
दीर्घकाळ झालेल्या अमेरिकेतील शट डाऊननंतर US डेटा समोर येत असून फारसं सकारात्मक चित्र त्यात नसल्याचे दिसून येते. उत्पादन मंदावले असून आर्थिक वाढ खुंटली आहे. कमकुवत डेटा-फेडवर दबाव-दर कपात आणि सोने तेजीत आहे. असाच पॅटर्न १९७९ मधील तेजीसाठी दिसून आला होता.
केंद्रीय बँकांकडून खरेदीचा सपाटा...
जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी खरेदी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय, भू-राजकीय अस्थिरता कमी करण्यासाठी आणि परदेशी चलनाचा राखीव साठा सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. ही खरेदी सोन्याच्या किमतींसाठी एक मजबूत आधार राहिली आहे. असेच चित्र १९७९ मध्ये दिसून आले.
advertisement
ETF Inflows चा मजबूत सपोर्ट
गोल्ड ईटीएफमध्ये स्थिर Inflow आहे. ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड दिसत असल्याने मोठे ग्लोबल फंड सोन्यावर अधिक विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचमुळे सोन्याचा दर हा ४,३८० डॉलरवर पोहोचला होता.

२०२५-२६ मध्ये सोन्याचे नवीन सुपर-सायकल होईल का?

परिस्थिती १९७९ मध्ये होती तशीच आहे. व्याजदर घसरणे, डॉलर कमकुवत होणे, महागाई अनिश्चित असणे, भू-राजकीय तणाव आणि आक्रमकपणे मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली खरेदी या सगळ्यांमुळे सोन्याचा दर वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच २०२५-२६ हे वर्ष गोल्ड सुपर सायकलमध्ये होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठ्या तेजीचे संकेत दिसून येत असल्याचेही एक्सपर्टने म्हटले.
advertisement
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. हा कोणताही आर्थिक सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागांराचा सल्ला घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement