Gold Price News : एक नंबर! 9500 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, चांदीसाठी किती मोजावे लागणार पैसे?

Last Updated:

Gold Silver Rate : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत ९५०० रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही २६२५० रुपयांनी घसरण, आजचा दर काय?
सोन्याच्या किंमतीत ९५०० रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही २६२५० रुपयांनी घसरण, आजचा दर काय?
Gold Price: सोन्याच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर त्यात पुन्हा घसरण सुरू झाली. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आज सलग चौथ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात सोनं-चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात काही महिन्यांपूर्वीच चांगलीच उसळण आली होती. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली होती. आजही सलग चौथ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली.

>> सोन्याच्या दरात ९५०० रुपयांची घसरण...

मागील महिनाभरात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर त्यात घसरण सुरू झाली. त्यानंतर सोनं आता ९,५०८ रुपयांनी घसरले आहे. १७ ऑक्टोबर रोजी १,३०,८७४ रुपये प्रति १० ग्रॅम दर होता. तर,
advertisement
१४ ऑक्टोबर रोजी चांदीने १,७८,१०० रुपयांचा दर गाठला होता. दराचा उच्चांक गाठल्यानंतर चांदी आता २६,२५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

>> सोनं-चांदीचा दर काय?

आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५५८ रुपयांनी घसरून १,२१,३६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत आता १,२५,००६ रुपये आहे. जीएसटीसह चांदी १,५६,४०५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. चांदीचा दर आज प्रति किलो १,५१,८५० रुपयांवर उघडला. जीएसटीशिवाय ३,०८३ रुपयांनी चांदीचा दर घसरला. सोमवारी, चांदीचा दर जीएसटीशिवाय १,५४,९३३ रुपये प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय १,२२,९२४ रुपये प्रति १० ग्रॅम दरावर बंद झाला.
advertisement

>> कॅरेटनुसार सोन्याचे दर

> आज, २३ कॅरेट सोने देखील १,५५८ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,२०,८८० रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,२४,५०६ आहे. या मेकिंग चार्जेस नाहीत.
> २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४२७ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,११,१७१ रुपयांवर आली आहे. जीएसटीसह ती १,१४,५०६ रुपयांवर आहे.
> १८ कॅरेट सोन्याचे दर १,१६८ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ९१,०२५ रुपये झाले आहेत आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९३,७५५ रुपये झाली आहे.
advertisement
> १४ कॅरेट सोन्याची किंमतही ९१२ रुपयांनी घसरली आहे. आज ते ७०,९९९ रुपयांवर उघडले आणि आता जीएसटीसह ७३,१२८ रुपयांवर आहे.
या वर्षी सोने प्रति १० ग्रॅम ४५,६२६ रुपयांनी महाग झाले आहे. तर चांदी ६५,८३३ रुपयांनी प्रति किलोने वाढली आहे.
(Disclaimer: इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA हे दिवसातून दोनदा दर जाहीर करते. दुपारी १२ आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दर जाहीर केले जातात.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price News : एक नंबर! 9500 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, चांदीसाठी किती मोजावे लागणार पैसे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement