भाऊराया ऐवजी सोन्या चांदीनेच खाल्ला भाव! जळगावच्या सुवर्णनगरीत काय आहेत दर?

Last Updated:

‘भाऊ अनमोल… पण राखी थोडी हलकी!’ सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींचा खरेदीवर परिणाम

News18
News18
जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर: रक्षाबंधानानिमित्ताने सराफ मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा थोडी जास्त गर्दी पाहायला मिळाली. आपल्या अनमोल भावांसाठी चांदीच्या राख्यांचा ट्रेंड सध्या खूप चर्चेत असल्याने सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या दाखल झाल्या आहेत.
मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे खरेदीसाठी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जळगावला 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखले जाते. यावर्षी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध आहेत, पण सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 4 हजार रुपये प्रति तोळा इतका वाढल्याने खरेदीदारांचे बजेट कोलमडले आहे. अनेक महिलांनी सोन्या-चांदीच्या राख्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
advertisement
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाववाढीचा थेट परिणाम राख्यांच्या खरेदीवर झाला असून, अनेक बहिणींना त्यांच्या आवडीच्या राख्या खरेदी करणे अवघड झाले आहे. माझा भाऊ माझ्यासाठी अनमोल आहे मात्र यंदा भाव एक लाख रुपयांच्या वर गेल्यानं माझं बजेट कोलमडलं आहे, त्यामुळे कमी ग्रॅममध्येच राखी खरेदी करण्याचं समाधान मानावं लागत असल्याची प्रतिक्रिया एका युवतीनं दिली.
advertisement
रक्षाबंधनासाठी बहिणीला गिफ्ट घ्यायला आलेला भाऊ सोन्या चांदीचे दर पाहून काहीसा हताश झाला. दरवर्षीप्रेमाणे यंदा सोन्या चांदीच्या वस्तूंची छानशी भेट देणं थोडं बजेटच्या बाहेर जात असल्याने तो निराश झाला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आज सोन्या चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलोमागे एक लाख 18 हजार रुपये झाले आहेत. तर सोनं प्रति तोळ्यामागे एक लाख चार हजार रुपये किलो आहे.
advertisement
ही तर फक्त झाली सोन्याची किंमत मात्र त्यावर लागणारा मेकिंग चार्ज, GST या सगळ्यांचा विचार करत हे बजेट आणखी वाढत असल्याने काहीशी निराशा व्यक्त केली आहे. तर काही भाऊ कोसळणाऱ्या मार्केटमध्ये सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल म्हणून आपल्या बहिणीला सोन्या चांदीचे कॉइन भेट म्हणून देत आहेत.
सोन्या चांदीचे भाव वाढल्याने ग्राहक कमी ग्रॅममधील सोन्या चांदीचा ट्रेंड फॉलो करत आहेत. 9 आणि 14 कॅरेटचे सोनं चांदी खरेदी करण्याकडे कल जास्त असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीची खरेदी करण्याचं प्रमाण कमी असल्याचं सराफ व्यवसायिकांनी देखील सांगितलं आहे.
मराठी बातम्या/मनी/
भाऊराया ऐवजी सोन्या चांदीनेच खाल्ला भाव! जळगावच्या सुवर्णनगरीत काय आहेत दर?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement