तुमचे पैसे बँकेतही सुरक्षित नाहीत, बुडाली तर किती पैसे मिळतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य उत्तर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बँक बुडाल्यास तुमचे पैसे सुरक्षित नसतात. बँकेच्या नियमानुसार फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम इंश्युरन्सद्वारे मिळू शकते. RBI बैठकीत इंश्युरन्सची रक्कम 10 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबई: बँक खात्यावर पगार, फिक्स डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंड असे अनेक वेगवेगळ्या खात्यांवर पैसे ठेवलेले असतात. पण कधी विचार केलाय का? बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघालं किंवा बँकेला आग लागली असेल तुमच्या पैशांचं काय? तुमचे पैसे किती सुरक्षित आहेत? तुमचे पैसे तुम्हाला मिळू शकतात का? तर तुमचे पैसेही बँकेत सुरक्षित नाहीत. याचं कारण म्हणजे एका लिमिटपलीकडे तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा मिळत नाहीत. बँकेच्या नियमानुसार जी रक्कम इंश्युरन्समध्ये दिलेली आहे तेवढीच रक्कम बँक तुम्हाला नियमानुसार देऊ शकते.
पूर्वीच्या काळी लोक पैसे घरात चोरी होतात म्हणून ठेवायचे नाहीत. पैसे सरळ उचलून बँकेत ठेवायचे. मात्र आजकाल बँकेतही एका मर्यादेनंतर पैसे सुरक्षित नाहीत असं वाटू लागलं आहे. असं म्हणण्यामागे नेमकं काय कारण आहे ते आधी सविस्तर समजून घेऊया. बँक बुडाली तर तुमच्या खात्यावर जी रक्कम जमा आहे त्यासाठी इंश्युरन्स काढलेला असतो. त्या नियमानुसार तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जर तुमची बँकेत असेल तर त्यावरील पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत.
advertisement
समजा तुमचे 10 लाख किंवा 8 लाख रुपये बँकेकडे जमा आहेत, बँक बुडाली तर तुम्हाला केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. त्यावरील पैसे हे बँकेकडे किती संपत्ती शिल्लक आहे यावरुन ग्राहकांना किती रुपये द्यायचे याचे नियोजन केले जाते. बँकेचं देणं कमी असेल तर तुम्हाला पैसे मिळतील मात्र बँकेचं देणं जास्ती असेल तर पैसे मिळणार नाहीत. मग अशा परिस्थितीत सापडू नये यासाठी तुम्ही एकाच बँकेत 10 लाख रुपये जमा करण्याऐवजी 5-5 लाख रुपये दोन बँकांमध्ये जमा करू शकता. त्यामुळे रिस्क कमी होईल.
advertisement
डीआईसीजीसीकडून मिळणाऱ्या इंश्युरन्सची रक्कम वाढवण्यात यावी 5 लाखवरुन 10 लाख रुपये करण्यात यावी यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. RBI च्या बैठकीत यावर चर्चा होणार असून जूनमध्ये म्हणजे याच महिन्यात निर्णय येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
तुमचे पैसे बँकेतही सुरक्षित नाहीत, बुडाली तर किती पैसे मिळतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य उत्तर


