Share Market: गुंतवणूकदार उद्ध्वस्त,सर्वात वाईट काळ; तज्ज्ञांच्या भविष्यवाणीतून समोर आले पुढे काय होणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. सेन्सेक्स आणि निफ्टत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई: भारतीय शेअर बाजार गेल्या पाच महिन्यांपासून मोठी घसरण होत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीच्या फेऱ्यात अडकला आहे. NSE आणि BSE हे दोन प्रमुख निर्देशांक उच्चांकावरून अनुक्रमे 14.19% आणि 13.23% खाली आले आहेत. या घसरणीमुळे लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले असून बाजाराची पुढील दिशा कोणती असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
बाजाराच्या घसरणीमागची प्रमुख कारणे
उच्च मूल्यांकन– अनेक भारतीय कंपन्यांचे शेअर्स अपेक्षेपेक्षा जास्त महाग झाले होते. गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग सुरू केल्याने बाजार कोसळला.
परदेशी गुंतवणूकदारांचे पैसे काढणे– 2025 मध्ये आतापर्यंत 1 लाख कोटी रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून बाहेर काढले आहेत. त्यामुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
कंपन्यांचे कमकुवत आर्थिक निकाल– अनेक भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा खराब आले, त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला.
advertisement
जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता– अमेरिकेतील वाढती महागाई, डॉलरची मजबुती, चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि व्यापारयुद्ध यांचा भारतीय बाजारावर परिणाम झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण
- 27 सप्टेंबर 2024 रोजी सेन्सेक्स 85,978.25 आणि निफ्टी 26,277.35 या उच्चांकावर होता.
- गेल्या पाच महिन्यांत निफ्टी 3,729.8 अंकांनी तर सेन्सेक्स 11,376.13 अंकांनी घसरला आहे.
advertisement
- या घसरणीमुळे लाखो गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुंतवणूकदारांसाठी धोका वाढला का?
- शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर सुधारणांची शक्यता अद्याप दिसत नाही.
- डॉलर मजबूत होत असल्याने भारतीय रुपया कमजोर होत आहे, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार अजूनही पैसा बाहेर काढू शकतात.
- अनेक कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नवीन गुंतवणुकीसाठी सावधगिरी आवश्यक आहे.
advertisement
बँक आणि तज्ज्ञांचे मत
- डॉयचे बँकेच्या रिपोर्टनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ संपला आहे. 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 6.2% राहण्याचा अंदाज आहे.
- जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांच्या मते, भारतीय बाजारात मोठी अनिश्चितता आहे आणि ही परिस्थिती काही काळ राहू शकते.
advertisement
- मास्टर ट्रस्ट ग्रुपचे पुणीत सिंघानिया म्हणतात, FII (Foreign Institutional Investors) गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडत असल्याने पुढील काही आठवडे बाजारासाठी कठीण असतील.
बाजार सुधारेल का?
- जर कंपन्यांचा नफा वाढला, सरकारने बाजारस्नेही धोरणे आखली आणि जागतिक अर्थव्यवस्था स्थिर झाली तर बाजारात सुधारणा होऊ शकते.
- मात्र, जर महागाई वाढली, मंदी आली किंवा परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढणे सुरूच ठेवले, तर बाजार अजून घसरण करू शकतो.
advertisement
शेअर बाजाराचे काही खरे नाही, छोट्या गुंतवणूकदारांना पैसे वाचवायचे असतील तर...
भारतीय शेअर बाजार सध्या मोठ्या घसरणीच्या टप्प्यात आहे. गुंतवणूकदारांनी घाईगडबडीने गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत आणि अत्यंत सावधगिरीने दीर्घकालीन रणनीती ठेवावी. बाजारातील सुधारणा सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि जागतिक परिस्थितीवर अवलंबून असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market: गुंतवणूकदार उद्ध्वस्त,सर्वात वाईट काळ; तज्ज्ञांच्या भविष्यवाणीतून समोर आले पुढे काय होणार