Petrol Price: एका कप चहापेक्षा स्वस्त पेट्रोल, फक्त 2.47 प्रति लिटर; हे वाचून भारतीय रागाने पेटणारच
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Cheapest Petrol Price In World : जगात काही देश असे आहेत जिथे पेट्रोलची किंमत एका कप चहापेक्षाही कमी आहे. इराणमध्ये पेट्रोल फक्त 2.47 प्रति लिटर दराने मिळत असून भारतात मात्र नागरिकांना यासाठी तब्बल 95 ते 100 पर्यंत मोजावे लागत आहे.
नवी दिल्ली: पेट्रोलचे दर हा भारतात नेहमीच चर्चेचा विषय असतो. सध्या देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभर रुपयांहून अधिक आहेत. पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात काही असे देशही आहेत जिथे एक लिटर पेट्रोल एका कप चहापेक्षा स्वस्त आहे. शेजारी देश पाकिस्तान आणि भूतानमध्येही भारताच्या तुलनेत पेट्रोल स्वस्त आहे. सध्या जगात सर्वात स्वस्त पेट्रोल इराणमध्ये मिळते. तिथे पेट्रोलचा दर फक्त 2.47 प्रति लिटर आहे.
भारतीय ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी अमेरिकन नागरिकांच्या तुलनेत सुमारे 21 रुपये अधिक खर्च करावा लागतो. अमेरिका मध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 80 रुपयांपेक्षा कमी आहे. तर भारतात तो काही शहरांमध्ये 100 रुपयांहून अधिक आहे. इराण आणि लिबिया सारख्या देशांमध्ये जिथे एक लिटर पेट्रोल टॉफीपेक्षा स्वस्त आहे. तिथेच हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात महाग पेट्रोल विकले जाते. तिथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल 304 मोजावे लागतात.
advertisement
का स्वस्त आहे पेट्रोल?
जगात इराण, लिबिया, व्हेनेझुएला, अंगोला आणि इजिप्तमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. इराणमध्ये पेट्रोलचा दर फक्त $0.029 ( 2.51 रुपये) प्रति लिटर आहे. मोठ्या प्रमाणावरील तेल साठे आणि मोठ्या प्रमाणावरील सबसिडीमुळे इथे पेट्रोल अतिशय स्वस्त आहे. लिबिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे पेट्रोल $0.031 ( 2.63) प्रति लिटर दराने मिळते. अफ्रिकेमधील सर्वाधिक तेल साठा या देशाकडे आहे. म्हणून त्यांना हा लाभ मिळतो. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला तिसऱ्या स्थानावर आहे. जिथे पेट्रोल $0.035 ( 3.03) प्रति लिटर दराने मिळते. इथेही तेल साठे भरपूर असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो.
advertisement
अफ्रिकेतील अंगोला येथे पेट्रोलचा दर $0.328 ( 28.44) प्रति लिटर आहे. हा देश अफ्रिकेतील एक मोठा तेल उत्पादक आहे. ज्यामुळे स्थानिक उत्पादनाच्या जोरावर इथे पेट्रोलचे दर नियंत्रणात राहतात. सरकार ग्रामीण भागात पेट्रोल उपलब्ध करण्यासाठी सबसिडी देते. इजिप्तमध्ये पेट्रोलचा दर $0.339 (₹29.39) प्रति लिटर आहे. हा देश स्वतः पेट्रोलचा उत्पादक आणि ग्राहक आहे. सरकार विशेषतः निम्न उत्पन्न गटासाठी इंधनावर सबसिडी देते.
advertisement
पाकिस्तानमध्येही भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल
भारताच्या काही शेजारी देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत कमी आहेत. चीनमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 94.5 आहे. पाकिस्तानमध्ये 80.4, बांगलादेशमध्ये 85 आणि भूतानमध्ये फक्त 58.8 प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते.
भारतात पेट्रोल महाग का?
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, 1 जुलै 2025 रोजी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 94.77 होता. यामध्ये पेट्रोलचा बेस प्राइस 52.83 होता.त्यानंतर त्यात 0.24 भाडे,21.90 एक्साइज ड्युटी, 4.40 डीलर कमिशन आणि 15.40 व्हॅट आणि डीलर कमिशनवरील व्हॅट जोडले गेले. अशा प्रकारे बेस प्राइस 52.83 वर इतर चार्जेस 41.94 जोडले गेल्यामुळे पेट्रोल 94.77 प्रति लिटर दराने विकले गेले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Petrol Price: एका कप चहापेक्षा स्वस्त पेट्रोल, फक्त 2.47 प्रति लिटर; हे वाचून भारतीय रागाने पेटणारच