क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरल्यास क्रेडिट स्कोर खरंच खराब होतो का? जाणून घ्या!

Last Updated:

क्रेडिट कार्डाचे पेमेंट उशिरा केल्यास क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. 7 दिवस उशिरा पेमेंट केल्यास थोडासा परिणाम होतो, तर 90 दिवसांपेक्षा जास्त उशिरा केल्यास गंभीर परिणाम होतात.

क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड
क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डचा सर्वात जास्त वापर करतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डाचे एक जरी पेमेंट उशिरा केले, तर त्याला छोटी चूक समजू नका. कारण फायनान्सच्या जगात याचा खूप मोठा परिणाम होतो. यामुळे केवळ तुमचा क्रेडिट स्कोरच खराब होत नाही, तर तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. कर्ज देणारे याला आर्थिक शिस्तीचा अभाव म्हणून पाहतात.
भारतात क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान असतो आणि 750 पेक्षा जास्त स्कोर चांगला मानला जातो. एक जरी पेमेंट उशिरा झाल्यास तुमचा स्कोर 50 ते 150 पॉइंट्सपर्यंत खाली येऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी जर तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट केलं नाही तर क्रेडिट स्कोअरचं नुकसान होऊ शकतं हे नक्की आहे. आता हे समजून घ्यायला हवं की किती पेमेंट उशिरा केलं तर तुमचे पॉईंट कमी होतात.
advertisement
7 दिवस उशिरा पेमेंट केलं तर त्याचा थोडासा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. मात्र 15 दिवसांपेक्षा जास्त पेमेंट उशिराने केलं तर 50-100 पॉईंट्सने तुमचा क्रेडिट स्कोअर खाली घसरण्याची शक्यता आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला तर 90 ते 110 पॉईंटपर्यंत क्रेडिट स्कोअरमध्ये घट होण्याची शक्यता आहे. 60 दिवसांपेक्षा जास्त झाले तर 130 ते 150 पॉईंटपर्यंत स्कोअर खाली येऊ शकतो.
advertisement
90 दिवस तुम्ही पेमेंट उशिरा केलं तर या दरम्यान तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, ज्यात क्रेडिट स्कोरमध्ये मोठी घट आणि भविष्यात कर्ज मिळण्यात अडचण यांचा समावेश आहे. 120 दिवसांपेक्षा जास्त पेमेंट उशिरा केलं तर अशा प्रकारची चूक तुमच्या क्रेडिट स्कोरला कायमचे नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट मिळवणे खूप कठीण होते.
advertisement
वेळेवर पेमेंट करण्यासाठी काय करावे?
ऑटोमॅटिक पेमेंट सेट करा: अनेकदा लोक देयकाचे पेमेंट करायला विसरतात. त्यामुळे ऑटोमॅटिक पेमेंट सेट करणे चांगले आहे. रिमाइंडर आणि अलार्मचा वापर करा: हे वेळेवर पेमेंटची आठवण करून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पेमेंटची तारीख बदलून घ्या: पगार आल्याच्या आसपासची तारीख पेमेंटसाठी निश्चित करा. इमरजेंसी फंड तयार ठेवा: अचानक आलेल्या खर्चांसाठी हा फंड उपयोगी ठरू शकतो. कर्ज देणाऱ्यांशी संपर्क साधा: अडचण आल्यास त्वरित कर्ज देणाऱ्यांशी बोला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरल्यास क्रेडिट स्कोर खरंच खराब होतो का? जाणून घ्या!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement