MCS चं शिक्षण, पण नोकरी सोडावी लागली; सुरू केलं हॉटेल, आता गर्दीही आणि पैसाही!

Last Updated:

जेवण बनविण्याची आवड असल्याने अनेक महिलांनी आपल्या हाताची चव इतराना देण्यासाठी मोठ मोठी हॉटेल चालू केल्या आहेत. अशाच नाशिकच्या प्रज्ञा अनिरुद्ध यांनी देखील बल्लवराज व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल सुरू केले आहे.

+
MCS

MCS चं शिक्षण, पण नोकरीचा नादच सोडला; सुरू केलं हॉटेल, आता गर्दीच हाटंना!

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: आपल्या अंगी असणारी कला ओळखून व्यवसाय केल्यास नोकरीपेक्षा चांगली कमाई होऊ शकते. हेच ओळखून नाशिकमधील एका उच्चशिक्षित तरुणीने नोकरी सोडून स्वत:चं हॉटेल सुरू केलं. आता याच ‘बल्लवराज व्हेज आणि नॉनव्हेट’ हॉटेलच्या माध्यमातून प्रज्ञा अनिरुद्ध या चांगली कमाई करत आहेत. तसेच त्या महिलांना रोजगार देखील देत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून प्रज्ञा यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ.
advertisement
प्रज्ञा यांनी संगणक विषयात पदव्युत्तर (एमसीएस) शिक्षण घेतलं आणि पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी सुरू केली. परंतु, पतीची नोकरीच्या निमित्ताने नाशिकला बदली झाली. सततची बदली आणि नोकरीचं टेन्शन यावर स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय प्रज्ञा यांनी घेतला. स्वयंपाक चांगला बनवण्यास येत असल्यानं त्यांनी स्वत:चं हॉटेल सुरू करण्याचा विचार केला. पहिल्यांदा एका फूड मॉलमध्ये स्वत:चा स्टॉल लावला. परंतु, याठिकाणी व्यवसायात मोठं नुकसान झालं, असं प्रज्ञा सांगतात.
advertisement
जिद्दीनं पुन्हा सुरू केलं हॉटेल
पहिल्यांदाच फूड बिझनेसमध्ये नुकसान सहन करावं लागलं. मात्र, पतीच्या सहकार्यामुळं प्रज्ञा यांनी पुन्हा स्वत:चं हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये इंदिरानगर परिसरात गुरु गोविंदसिंग कॉलेज समोर ‘बल्लवराज’ या नावानं व्हेज नॉनव्हेज हॉटेल सुरू केलं. विशेष म्हणजे पहिल्यांदा सुरू केलेल्या व्यवसायातील चुका टाळून नव्या व्यवसायात त्यांनी महिला कामगारांना प्राधान्य दिलं. यातून त्यांचा नव्या हॉटेल व्यवसायात चांगलाच जम बसला. आता येथील जेवणासाठी नाशिककर खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असं प्रज्ञा यांनी सांगितलं.
advertisement
महिलाच चालवतात व्यवसाय
प्रज्ञा यांनी आपल्या हॉटेल व्यवसायात महिला कामगारांना प्राधान्य दिलं. महिलांनी बनवलेल्या डिशना खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. इथे 200 रुपयात अनलिमिटेड चिकन थाळी, 250 रुपयांत अनलिमिटेड मटण थाळी मिळते. त्यात रस्सा, चपाती, भात देखील पोटभर खाऊ शकता. इतकेच नाही तर बिर्याणी प्रेमींसाठी देखील यांच्याकडे नेहमी ऑफर असते. त्यामुळे ग्राहकांची कायमच गर्दी असते. नोकरीत दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय कधीही चांगला, असं प्रज्ञा सांगतात.
मराठी बातम्या/मनी/
MCS चं शिक्षण, पण नोकरी सोडावी लागली; सुरू केलं हॉटेल, आता गर्दीही आणि पैसाही!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement