Income Tax: नोकरी करणाऱ्यांसाठी कोणता Tax रिजीम चांगला, जुना की नवा?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
या नवीन रचनेत सरकारने कर दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर जर तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये असेल, तर तुम्हाला सुमारे 80,000 रुपयांपर्यंत कर बचत होऊ शकते.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच, पगारदारांच्या मनात हमखास एक प्रश्न पडतो, "जुना टॅक्स रिजीम ठेवायचा की नवीन?" हाच निर्णय अनेक कुटुंबांच्या घरखर्चावर, गुंतवणुकीवर आणि भविष्याच्या योजनांवर परिणाम करणारा असतो. यंदा मात्र, 2025 च्या अर्थसंकल्पानंतर मोदी सरकारने ज्या पद्धतीने नवीन कर प्रणाली सादर केली आहे, ती पाहता, बहुतांश मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय.
या नवीन रचनेत सरकारने कर दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर जर तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये असेल, तर तुम्हाला सुमारे 80,000 रुपयांपर्यंत कर बचत होऊ शकते. ही रक्कम कोणासाठीही लहान नाही, एखाद्या मुलाचं शैक्षणिक फी भरता येईल, कुटुंबासोबत एक छोटं सहल करता येईल किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करता येईल.
advertisement
0-4 लाखवर कर नाही, 4-8 लाखवर फक्त 5%, आणि टप्प्याटप्प्याने वाढणारे दर हे सामान्य कुटुंबाच्या खर्चाला झटका न देता दिलासा देणारे ठरतात. विशेष म्हणजे, आता 12.75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना संपूर्ण करमाफी मिळू शकते. गलेलठ्ठ पगार असणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत 72% करदात्यांनी ही नवी प्रणाली स्वीकारली आहे, आणि येत्या वर्षभरात 90% पेक्षा जास्त लोक ती निवडतील, असा विश्वास सरकारला आहे.
advertisement
तुमच्या गरजा, खर्च आणि भविष्याची योजना’ यांचं भान ठेवून कर प्रणाली निवडा. आणि हो, सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला टॅक्स कॅल्क्युलेटर वापरायला विसरू नका. एक स्मार्ट निर्णय तुमच्या संपूर्ण वर्षभराच्या आर्थिक आराखड्याला आकार देऊ शकतो, शिवाय तुमचे पैसेही वाचतील, त्यातून तुम्ही पुन्हा गुंतवणूक करू शकता किंवा कुटुंबासाठी एखादी ट्रिप प्लॅन करू शकता.
Location :
First Published :
May 03, 2025 10:55 AM IST