Post Office FD Scheme: 5 वर्षांत मिळतील 14,49,948 रुपये, बस्स खात्यावर जमा करा इतके पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी किती रुपयांची गुंतवणूक केल्यास 14,49,948 मिळतील ते जाणून घेऊयात.
मुंबई: आपलं जेवढं उत्पन्न असतं, त्यातून खर्च वगळता काही रक्कम उरते तिची भविष्यासाठी गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीसाठी आपण अनेक पर्यायांची चाचपणी करतो आणि निर्णय घेतो. गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याची हमी या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी किती रुपयांची गुंतवणूक केल्यास 14,49,948 मिळतील ते जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिसमध्ये किती वर्षांसाठी किती व्याज मिळतं?
एका वर्षासाठी 6.9% व्याज मिळते.
दोन वर्षासाठी 7% व्याज मिळते.
तीन वर्षांसाठी 7% व्याज मिळते.
पाच वर्षांसाठी 7.5% टक्के व्याज मिळते.
हे व्याज दर तिमाहीनंतर मोजले जाते. या तीन महिन्यांच्या व्याजावरही व्याज मिळतं.
10 लाख रुपयांच्या एफडीवर किती व्याज मिळेल?
10 लाख रुपये पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवल्यास एक ते पाच वर्षांत किती फायदा होईल -
advertisement
एका वर्षासाठी व्याजदर 6.9% आहे. म्हणजे 1 वर्षानंतर तुमच्या 10 लाख रुपयांचे 10 लाख 69 हजार रुपये होतील. वर्षभरात तुमचा 69 हजार रुपयांचा फायदा होईल.
दोन वर्षासाठी व्याजदर सात टक्के आहे. म्हणजे दोन वर्षानंतर तुमच्या 10 लाख रुपयांचे 11 लाख 49 हजार रुपये होतील. वर्षभरात तुमचा एक लाख 49 हजार रुपयांचा फायदा होईल.
advertisement
तीन वर्षांसाठी व्याज दर देखील 7% आहे. तीन वर्षांनी तुमचे पैसे 12 लाख 25 हजार रुपये होतील. म्हणजे तुम्हाला 10 लाखांवर 2 लाख 25 हजार रुपयांचा फायदा मिळेल.
तुम्ही पाच वर्षांसाठी एफडी केल्यास त्यावर 7.5% व्याज मिळतं. तुमच्या 10 लाख रुपयांचे 14,49,948 रुपये होतील. तुम्हाला 10 लाख रुपयांवर 4,49,948 रुपयांचा फायदा होईल.
advertisement
पोस्ट ऑफिस एफडी का आहे सुरक्षित?
पोस्ट ऑफिस एफडी योजनेचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. ही सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात जोखीम नाही. तसेच लहान-मोठी शहरं आणि गावातही पोस्ट ऑफिस आहे, त्यामुळे तुम्ही सहज एफडी करू शकता.
व्याजावर द्यावा लागतो कर
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. व्याजाची गणना तुमच्या एकूण उत्पन्नात होईल व त्यावर टॅक्स लागेल.
advertisement
पाच वर्षांच्या एफडीत मिळते कर सूट
तुम्ही पाच वर्षांसाठी एफडी केल्यास त्यावर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.
एफडी योजना कोणासाठी फायद्याची?
ज्या लोकांना कोणतीही जोखीम न घेता पैसे सुरक्षित ठेवून परतावा पाहिजे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. खासकरून वृद्ध लोकांसाठी किंवा ज्यांना त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे, त्यांनी यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. व्याजदर ठरलेले असल्याने नफा कमी-जास्त होत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2024 2:13 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Post Office FD Scheme: 5 वर्षांत मिळतील 14,49,948 रुपये, बस्स खात्यावर जमा करा इतके पैसे