आम्ही भारताच्या बाजूने, पाकिस्तानच्या सर्वात जवळच्या मित्राने मारली 'पलटी'; मोदींची चाल यशस्वी!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India-Saudi Trade : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानला मोठा कूटनीतिक आणि आर्थिक धक्का दिला आहे. ज्या सौदी अरेबियाला पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र मानले जाते. त्याच सौदीने भारतासोबत अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करत पाकिस्तानला एकाकी पाडले आहे.
नवी दिल्ली: ज्या दिवशी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करत होता. त्याच वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या सर्वात मोठ्या हितचिंतकाला आपल्या बाजूला वळवण्याच्या रणनीतीवर काम करत होते. अखेरीस शेजारील देशाच्या हाती निष्पापांचे रक्त लागले आणि भारताला हजारो कोटी रुपयांचा सौदा मिळाला. जो आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करेल. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला असून सौदी अरेबियाने भारतात 2 तेल शुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
सौदी अरेबियाला नेहमीच पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र मानले जाते. 2023 मध्ये जेव्हा पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला होता आणि मदतीसाठी दारोदार फिरत होता. तेव्हा सौदी अरेबियानेच त्याला 2 अब्ज डॉलरची मदत केली होती. इतकेच नव्हे तर 2024 मध्येही सौदी अरेबियाने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरची मदत केली. पाकिस्तानचे बहुतेक विदेशी कर्ज थकीत झाले होते आणि पाकची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना सौदी अरेबियाने 11 अब्ज डॉलरच्या मदतीचे आश्वासनही दिले होते. सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी कामगार आहेत. जे दरवर्षी आपल्या देशात सुमारे 6 अब्ज डॉलरची रक्कम पाठवतात. यावरून स्पष्ट होते की पाकिस्तानला सर्वाधिक मदत सौदी अरेबियाकडून मिळते.
advertisement
भारताला सौद्यातून काय मिळणार?
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, सौदी अरेबिया भारतात 2 रिफायनरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल. यासाठी पायाभूत सुविधांपासून आर्थिक मदतीपर्यंत सर्व प्रकारची मदत दिली जाईल. सौदी अरेबियाने भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल (क्रूड) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचे आश्वासनही दिले आहे. गेल्या वर्षी भारताच्या एकूण क्रूड आयातीत सौदी अरेबियाचा वाटा सुमारे 17 टक्के होता.
advertisement
100 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे आश्वासन
सौदी अरेबियाचे राजकुमार त्यांचे 2019 मध्ये केलेले 100 अब्ज डॉलर (सुमारे 8.6 लाख कोटी रुपये) गुंतवणुकीचे आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी आतापर्यंत 10 अब्ज डॉलरची (86 हजार कोटी रुपये) गुंतवणूक झाली आहे. आता सौदी अरेबियाने पुन्हा एकदा भारतात 2 रिफायनरी उभारण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यामध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
advertisement
सौदी अरामकोही भारतात येऊ शकते
view commentsकोरोनापूर्वी सौदी अरेबिया हा आपला सर्वात मोठा क्रूडचा पुरवठादार होता. पण त्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. या द्विपक्षीय करारानंतर सौदी अरेबियाकडून पुन्हा एकदा क्रूडची खरेदी वाढू शकते. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोही दीर्घकाळापासून भारतात प्रवेश करण्याचा मार्ग शोधत आहे. मानले जात आहे की या करारानंतर भारतात रिफायनरी उभारण्यासाठी सौदी अरामको पुढे येऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 6:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
आम्ही भारताच्या बाजूने, पाकिस्तानच्या सर्वात जवळच्या मित्राने मारली 'पलटी'; मोदींची चाल यशस्वी!


