फक्त 140 रुपयांमध्ये करू शकता कोट्यवधींच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक, दर 3 महिन्याला होईल अशी कमाई
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अवघ्या 140 रुपयांत देशातल्या सगळ्यात मोठ्या कमर्शियल सेंटरमध्ये किंवा ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक करु शकता.
मुंबई : भारतात सर्वसामान्य माणूस आजही जमिन किंवा प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतो. कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणं ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यतली गोष्ट नाही. अवघ्या 140 रुपयांत देशातल्या सगळ्यात मोठ्या कमर्शियल सेंटरमध्ये किंवा ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक करु शकता आणि गुंतवलेल्या रकमेच्या हिशोबाने तीन महिन्यांनी भाडं मिळेल असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात ‘रीट’ हा रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग आहे.
समजा, तुम्ही मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये गुंतवणूक करु इच्छिता. तर त्यासाठी तुम्हाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. पण रीट सारख्या मार्गाने तुम्ही हे नक्की करु शकता. रीट बीकेसीमध्ये प्रॉपर्टी घेत असेल तर तुम्ही त्यात एक भागधारक होऊ शकता. रीटचं एक युनिट तुम्ही 140 ते 385 रुपये किमतीला खरेदी करु शकता. रीटचा पॅटर्न हा म्युच्युअल फंड कंपनीसारखा आहे. म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर तुमचे पैसे चांगल्या कंपनी किंवा शेअरमध्ये गुंतवून रिटर्न मिळवून देतो. रीटमध्ये गुंतवणुकीचा अनुभव असलेले प्रोफेशनल्स देशातील चांगल्या कमर्शिअल सेंटर्समध्ये, ऑफिस स्पेस किंवा मॉलमध्ये गुंतवणूक करतात.
advertisement
मोठमोठ्या कंपन्यांना त्या जागा भाड्याने देतात. त्यातून जे भाडं मिळतं त्यातून खर्च वजा करुन उर्वरित रक्कम गुंतवणुकदारांना देतात. सेबीच्या नियमानुसार रीटला आपल्या कमाईतील 90 टक्के पैसे गुंतवणुकदारांना परत देणं बंधनकारक असतं. गुंतवणुकदारांना सहा महिन्यांत किमान एकदा रेंट / डिव्हिडंड / भाडं देणं आवश्यक आहे. भारतातील चार रीट कंपन्या सध्या तीन महिन्यांनी गुंतवणुकदारांना रेंट / डिव्हिडंड / भाडं देतात. दर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या रिटर्न्सबरोबरच रिअल इस्टेटच्या किमती वाढतात तसं गुंतवणुकदारांना कॅपिटल ॲप्रिसिएशनही मिळतं. प्रॉपर्टीची किंमत वाढल्यास किंवा शेअरची किंमत वाढल्यास अशा दोन पद्धतीने हे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या रीटमध्ये 100 रुपयांचा एक शेअर घेतला असेल, पुढे त्या शेअरची किंमत 130 झाली तर रेंट व्यतिरिक्त तुम्हाला 30 रुपये जास्त मिळतील.
advertisement
रीट मॉडेल जगभर फार पूर्वीपासून प्रचलित आहे. भारतात रीट एम्बसी ऑफिस पार्क्स मार्च 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलं. सिलेक्ट ट्रस्ट हा भारतातील सर्वांत नवीन रीट नेक्सस आहे. 2023 मध्ये तो स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करण्यात आला. एम्बसी ऑफिस पार्क्स रीटच्या एका शेअरची किंमत 20 सप्टेंबरला 385.28 रुपयांना क्लोज झाली. माइंडस्पेस बिझनेस पार्क्स रीटची 20 सप्टेंबरची क्लोजिंग किंमत 349.54 रुपये होती. ब्रूकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टच्या शेअरची किंमत 20 सप्टेंबरला 275.35 रुपये तर नेक्सस सिलेक्ट रीटची किंमत 139.86 रुपये एवढी होती.
advertisement
स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्स घेतात तसंच लिस्टेड रीटचे शेअर्सही सामान्य गुंतवणूकदार घेऊ शकतात. 20 सप्टेंबर 2024 ला शेअर बाजार बंद झाला तेव्हा सर्वांत स्वस्त रीट शेअरची किंमत 139.86 रुपये होती. याचा अर्थ कोणत्याही रीटमध्ये तेवढे रुपये गुंतवून तुम्ही त्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर उत्तम रिटर्न्स सहज मिळवू शकता. अर्थात, याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन मगच गुंतवणूक करणं कधीही योग्य ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2024 2:48 PM IST
मराठी बातम्या/मनी/
फक्त 140 रुपयांमध्ये करू शकता कोट्यवधींच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक, दर 3 महिन्याला होईल अशी कमाई


