Share Market: बजेटमुळे शनिवारी शेअर मार्केट सुरू राहणार की बंद, खरेदी विक्री करता येणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून एमसीएक्स आणि शेअर बाजार सुरू राहणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करतील.
मुंबई : 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. शनिवार म्हटलं की शेअर मार्केट बंद असतं. मात्र यावेळी मार्केट बंद राहणार की सुरू अशी चर्चा सुरू असताना MCX ने निवेदन जारी करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. देशातील आघाडीचे एक्सचेंज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) येथे शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट देखील व्यवहारासाठी सुरू राहील असं निवेदनात म्हटलं. एमसीएक्सने बुधवारी ही माहिती दिली. एमसीएक्सने सांगितले की अर्थसंकल्पाच्या दिवशी विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाईल.
किती वेळ सुरू राहणार मार्केट?
1 फेब्रुवारी 2025 मल्टी कमोडिटी एक्सचेंज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहेत. एमसीएक्सने याबाबत निवेदन दिलं आहे, या निवेदनात त्यांनी म्हटलं की, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट सेगमेंटमधील भारतातील आघाडीचे एक्सचेंज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी बाजारातील सहभागींना ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी एक विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाईल.
advertisement
शेअर मार्केटला सुट्टी नाही
1 फेब्रुवारी रोजी केवळ एमसीएक्सच नाही तर शेअर बाजार देखील सुरू राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) यांनी स्वतंत्र परिपत्रके जारी करून ही माहिती दिली आहे. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत नेहमीसारखं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी मार्केट रिकव्हरीसाठी शनिवारी अर्धावेळी काहीवेळा शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय प्रायोगित पातळीवर घेण्यात आला होता. आठवड्याच्या शेवटी (शनिवार-रविवार) शेअर बाजार बंद असतो. बजेट असल्यामुळे मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 रोजी शनिवारीही अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता आणि त्या दिवशी शेअर मार्केट सुरू ठेवण्यात आला होता.
advertisement
1 फेब्रुवारीला सादर होणार बजेट
शनिवार आणि रविवारी शेअऱ मार्केट बंद असतं. मात्र यावेळी अर्थसंकल्प शनिवारी म्हणजे 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी एमसीएक्सने शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी लोकांमध्ये उत्साह वाढत आहे.1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याची आतूरता आहे. तर व्यवसायिकांसाठी काय खास असेल हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनांची मुदत आणि आर्थिक मदत वाढवणार हे पाहावं लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 7:13 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: बजेटमुळे शनिवारी शेअर मार्केट सुरू राहणार की बंद, खरेदी विक्री करता येणार?