Mutual Funds: पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? कोणता फंड निवडायचा

Last Updated:

मुंबई: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना डेट फंड, इक्विटी फंड आणि हायब्रिड फंड हे पर्याय आहेत. डेट फंड कमी रिस्क, इक्विटी फंड जास्त परतावा आणि हायब्रिड फंड विविधता देतात.

News18
News18
मुंबई: जर तुम्ही पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय मिळतील, ज्यामध्ये डेट फंड, इक्विटी फंड आणि हायब्रिड फंड यांचा समावेश आहे. पण प्रश्न असा आहे की, या तीन पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला तुमच्या गोल्सनुसार फायदा होऊ शकतो. गुंतवणूक करताना याची सविस्तर माहिती घेतली तर गुंतवणूक करणं सोपं जातं. डेट फंड, इक्विटी फंड आणि हायब्रिड फंड एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि ते तुम्हाला गुंतवणुकीत कशी मदत करतील ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
Debt Fund
शॉर्ट टर्म इन्वेस्टमेंट, कमी रिस्क असते. फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीमध्ये पैसा लावला जातो. गव्हर्मेंट बॉन्ड, कॉरपोरेट बॉन्ड, ट्रेजरी बिल्स, नॉन कन्वर्टेबल डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली जाते. कमी जोखीम आणि फिक्स्ड रिटर्न देणं हाच हेतू, रिटर्न जास्त नाही, पण सुरक्षितता जास्त असते.
Debt Fund चे प्रकार
Liquid funds ,Ultra-short duration funds ,Short duration funds ,Medium duration funds ,Dynamic bond funds, Income funds ,Corporate bond funds ,Gilt funds ,Money market funds ,Debt index funds
advertisement
Equity Fund
स्टॉक्स फंड म्हणून याची वेगळी ओळख आहे. पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावले जातात. यांना फंडला ग्रोथ फंड असेही म्हणतात. इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. यात धोका देखील जास्त आहे. मार्केट अस्थिर झालं किंवा वर खाली झालं तर त्यानुसार रिटर्न्समध्ये देखील बदल होतात. दुसरं म्हणजे लाँग टर्म इन्वेस्टमेंटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने संपत्ती किंवा भांडवलाची निर्मिती होते. शिवाय व्यावसायिक व्यवस्थापन आणि विविधीकरणाचा फायदा होतो. इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते. इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने लवचिक गुंतवणूक आणि प्रवेश-निर्गमन पर्याय उपलब्ध होतात
इक्विटी फंडांचे प्रकार
active fund, idle fund, large cap funds, mid cap funds, small cap funds, micro cap funds, diversified fund, regional fund, thematic fund
advertisement
हायब्रिड फंड्स
हायब्रिड म्युच्युअल फंड हे असे म्युच्युअल फंड आहेत जे अनेक प्रकारच्या गुंतवणुकी एकत्र करून तयार केले जातात. हे फंड इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये रिअल इस्टेट किंवा कमोडिटीजसारख्या इतर मालमत्तांचा देखील समावेश असू शकतो. हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना एकाच फंडात इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देतात.
advertisement
हाइब्रिड फंडचे फायचे
हे फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करतात. डेब्ट आणि इक्विटी या दोन्ही पद्धतीची गुंतवणूक या एका फंडमधून केली जाते. नव्याने म्युच्युअल फंड सुरू केलेल्या, किंवा ज्यांना जास्त रिस्क घ्यायची नाही पण चांगले रिटर्न्स हवेत अशा गुंतवणूकदारांसाठी हे फंड्स एक चांगला पर्याय आहे. हे फंड प्युअर इक्विटी किंवा डेट फंडांपेक्षा अधिक सहज परतावा देऊ शकतात. एफडीपेक्षा हे फंड्स जास्त रिटर्न्स देतात. स्थिरता जास्त असते. काहीवेळा पैसे गोल्डमध्येही लावले जातात. या फंडला बॅलन्स फंड असंही म्हटलं जातं.
advertisement
हायब्रिड फंडांचे प्रकार:
मल्टी एसेट एलोकेशन फंड, एग्रेसिव हाइब्रिड फंड, डायनेमिक एसेट एलोकेशन या बैलेंस्ड एडवांटेज फंड, कंसर्वेटिव हाइब्रिड फंड
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Mutual Funds: पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? कोणता फंड निवडायचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement