Silver Price Today: काही मिनिटांत 12000 रुपयांनी महाग झाली चांदी, 10 ग्रॅम 24 कॅरेटचं काय झालं?

Last Updated:

अमेरिका-इराण तणावामुळे सोन्या-चांदीचे दर विक्रमी वाढले आहेत. चांदी २.८७ लाखांवर, सोनं १.४३ लाखांवर पोहोचले. गुंतवणूकदारांना नफा, ग्राहकांना चिंता.

News18
News18
गेल्या वर्षी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत, पण २०२६ ची सुरुवात तर त्याहूनही भयंकर झाली. बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजार उघडताच चांदीच्या भावाने अक्षरशः रॉकेटच्या स्पीडने गती घेतली. अवघ्या काही मिनिटांत चांदीचे भाव १२,००० रुपयांनी दर वधारले, तर सोन्यानेही आपला जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ हादरली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची पसंती आता सोन्या-चांदीला मिळत आहे.
चांदीचा दर पावणे तीन लाखांच्या पार
बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दराने सर्वांनाच धक्का दिला. मंगळवारी चांदी २,७५,१८७ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, पण बुधवारी सकाळी ती थेट २,८७,९९० रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली. विशेष म्हणजे, या वर्षाच्या पहिल्या १० दिवसांतच चांदी ५२,११७ रुपयांनी महागली आहे. १ जानेवारीला जी चांदी २.३५ लाखांना मिळत होती, ती आता २.८७ लाखांवर गेली आहे.
advertisement
सोनंही थांबायला तयार नाही
चांदीसोबतच सोन्यानेही आपली घोडदौड कायम ठेवली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या १० दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या भावात ७,३६९ रुपयांची वाढ झाली आहे. १ जानेवारीला सोन्याचा भाव १,३५,८०४ रुपये होता, तो बुधवारी ८३२ रुपयांच्या वाढीसह १,४३,१७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
advertisement
नेमकी दरवाढ का होत आहे?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीमागे दोन प्रमुख कारणं आहेत: १. अमेरिका-इराण संघर्ष: जागतिक पातळीवर जेव्हा युद्धाची परिस्थिती किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी लोक सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित मानतात. २. जागतिक अनिश्चितता: परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली विक्री आणि ट्रम्प यांच्या काही निर्णयांनी बाजारात भीतीचं वातावरण आहे.
advertisement
सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री
सध्या लग्नसराईचे दिवस आणि सण सुरू आहेत. अशा काळात सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी असली तरी, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र ही चिंतेची बाब ठरत आहे. दुसरं म्हणजे ज्यांनी सिल्वरमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यांना मोठा नफा मिळत आहे. सोन्या चांदीतमध्ये ज्यांनी ऑनलाईन गुंतवणूक केली आहे त्यांना मोठा फायदा मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Silver Price Today: काही मिनिटांत 12000 रुपयांनी महाग झाली चांदी, 10 ग्रॅम 24 कॅरेटचं काय झालं?
Next Article
advertisement
Dry Day In Maharashtra: तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
  • आजपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या 'मधुशाला' बंद राहणार आहेत.

  • पुढील तीन दिवस तळीरामांचे हाल होणार असून ड्राय डे असणार आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आह

View All
advertisement