भाजीपाला व्यापार करणारी कंपनी शेअर बाजारात! आयपीओत एका शेअरची किंमत किती?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Stanbik Agro IPO : अहमदाबादमध्ये कार्यरत असलेली भाजीपाला व्यापार क्षेत्रातील कंपनी स्टॅनबिक ॲग्रो आता भांडवली बाजारात प्रवेश करत असून, बीएसईच्या एसएमई (लघु व मध्यम उद्योग) प्लॅटफॉर्मवरून सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे.
मुंबई : अहमदाबादमध्ये कार्यरत असलेली भाजीपाला व्यापार क्षेत्रातील कंपनी स्टॅनबिक ॲग्रो आता भांडवली बाजारात प्रवेश करत असून, बीएसईच्या एसएमई (लघु व मध्यम उद्योग) प्लॅटफॉर्मवरून सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे. या आयपीओद्वारे कंपनी सुमारे 40 कोटी रुपयांचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) गाठण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. विशेष म्हणजे, एका भाजीपाला विक्रेत्या कंपनीचा आयपीओ असल्याने हा विषय सध्या गुंतवणूकदारांमध्ये तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
advertisement
शेअरची किंमत किती?
स्टॅनबिक ॲग्रो या आयपीओअंतर्गत 30 रुपये प्रति शेअर या दराने सुमारे 41 लाख शेअर्स आणून अंदाजे 12.3 कोटी रुपये भांडवल उभं करणार आहे. उर्वरित रक्कम प्री-आयपीओ वाटप आणि इतर माध्यमांतून उभारली जाणार असल्याचे समजते. कमी किमतीतील हा आयपीओ असल्याने किरकोळ गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष या ऑफरकडे वेधले गेलं आहे.
advertisement
याआधी दिल्लीमध्ये केवळ दोन शोरूम असलेल्या दुचाकी विक्रेता कंपनी रिसोर्सफुल ऑटो हिनेही अशाच प्रकारे बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवरून ऑगस्ट 2024 मध्ये सुमारे 12 कोटी रुपये उभारले होते. मात्र त्या आयपीओचा अनुभव गुंतवणूकदारांसाठी फारसा सुखद ठरलेला नाही. 117 रुपये दराने जारी करण्यात आलेला हा शेअर सध्या बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सुमारे 53 रुपयांपर्यंत घसरलेला आहे. त्यामुळे स्टॅनबिक ॲग्रोच्या आयपीओकडे पाहताना गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येते.
advertisement
बीएसईकडील माहितीनुसार, स्टॅनबिक ॲग्रोचा आयपीओ 12 डिसेंबर रोजी खुला झाला असून, तो 16 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. आयपीओच्या पहिल्याच दिवशी सुमारे 5 टक्के शेअर्सना सदस्यता मिळाली होती. हा शेअर 19 डिसेंबर रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. या सार्वजनिक ऑफरचे व्यवस्थापन ग्रो हाऊस वेल्थ मॅनेजमेंट करत असून, एम अँड एम स्टॉक ब्रोकिंग या शेअरसाठी मार्केट मेकरची भूमिका बजावत आहे.
advertisement
आर्थिक कामगिरी कशी?
आर्थिक कामगिरीकडे पाहिले असता, स्टॅनबिक ॲग्रोने गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 33 टक्क्यांनी वाढून 26.6 कोटी रुपये झाला होता. त्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजे आर्थिक वर्ष 2025 मध्ये महसूल जवळपास दुप्पट होऊन 52.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 11:48 AM IST









