Income Tax Slab Budget 2025: नोकरदारांसाठी मोठी बातमी! 12 लाख रुपयांपर्यंत इनकम टॅक्स नाही

Last Updated:

Income Tax Slab Budget 2025: 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. भारत सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली

News18
News18
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत अपेक्षा होती, तर ओल्ड टॅक्स रिजीममधून कर भरणाऱ्यांसाठी काय नियम आणले जाणार याची उत्सुकता देखील होती. या सगळ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बजेटमध्ये आयकरबाबत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही. भारत सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली, जी जुन्या रिजीमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे. नव्या रिजीममध्ये फक्त NPS वर सूट दिला जाते. तर जुन्या रिजीममधून अनेक गोष्टींवर लाभ घेता येऊ शकतो.
जुना रिजीम
जुनी कर प्रणाली कर वाचवण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती व वजावटी (डिडक्शन) उपलब्ध करून देते. त्यामध्ये 80C, 80D, HRA (गृहराहत भत्ता), एलटीसी (लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स) यांसारख्या विविध सूट वजावट मिळते.
advertisement
जुना रिजीमचे फायदे:
पीएफ (Provident Fund), विमा, घरकर्ज व्याज यांसारख्या गुंतवणुकींवर कर सूट मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. कुटुंबासाठी वैद्यकीय खर्चावर सवलत.
जुना रिजीमचे तोटे:
करप्रक्रिया थोडी किचकट आहे. जास्त कर भरावा लागू शकतो, जर वजावटीचा लाभ घेतला नाही.
नवा टॅक्स रिजीम
ही प्रणाली कमी टप्पे आणि सुलभ कर दरासह लागू करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वजावटी (deductions) आणि कर सवलतीचा समावेश नाही, मात्र कर दर तुलनेने कमी आहेत.
advertisement
नवा टॅक्स रिजीमचे फायदे:
सरळ आणि सोपी कर रचना.कमी कर दर, त्यामुळे उच्च उत्पन्न असणाऱ्यांसाठी फायदेशीर. कोणत्याही गुंतवणुकीवर बंधन नाही.
नवा टॅक्स रिजीमचे तोटे:
कोणत्याही वजावटीचा लाभ मिळत नाही. दीर्घकालीन बचतीला चालना मिळत नाही.
कोणती प्रणाली निवडावी?
जर एखाद्या व्यक्तीला कर बचतीसाठी गुंतवणूक करायची नसेल आणि त्याला सुलभ करप्रणाली हवी असेल, तर नवीन कर प्रणाली योग्य आहे. मात्र, कर बचतीच्या दृष्टीने विचार केल्यास आणि विविध वजावटीचा लाभ घ्यायचा असेल, तर जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Income Tax Slab Budget 2025: नोकरदारांसाठी मोठी बातमी! 12 लाख रुपयांपर्यंत इनकम टॅक्स नाही
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement