8,27,59,50,00,000 रुपये एक झटक्यात गमावले, एका गोष्टीमुळे जगातील श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर, नक्की असं काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका आंतरराष्ट्रीय रिपोर्टने असा काही भूकंप आणला की, पंगेस्टु यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि एका दिवसात इतका मोठा तोटा कसा झाला? जाणून घेऊया.
मुंबई : शेअर बाजार म्हटलं की अनेकांना एका रात्रीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पडते. कधी मार्केट वर जातं, तर कधी खाली. पण विचार करा, जर कोणी तुम्हाला सांगितलं की जगातील एका मोठ्या अब्जाधीशाची संपत्ती एकाच दिवसात तब्बल 75,000 कोटी रुपयांनी (9 अब्ज डॉलर्स) कमी झाली, तर? ऐकायलाही धडकी भरते ना? सर्वसामान्य माणूस आयुष्यभर मेहनत करून जेवढी पुंजी जमा करतो, त्याच्या कित्येक हजार पट संपत्ती या श्रीमंत व्यक्तीने अवघ्या काही तासांत गमावली आहे.
हे घडलंय इंडोनेशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती प्रजोगो पंगेस्टु (Prajogo Pangestu) यांच्यासोबत. एका आंतरराष्ट्रीय रिपोर्टने असा काही भूकंप आणला की, पंगेस्टु यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि एका दिवसात इतका मोठा तोटा कसा झाला? जाणून घेऊया.
इंडोनेशियाच्या शेअर बाजारात सध्या चिंतेचे ढग दाटले आहेत. जागतिक निर्देशांक प्रदाता MSCI (Morgan Stanley Capital International) च्या एका अहवालाने इंडोनेशियातील मोठ्या कंपन्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बघता बघता गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली.
advertisement
1. प्रजोगो पंगेस्टु: एका दिवसात ९ अब्ज डॉलर्सचा फटका
इंडोनेशियातील ऊर्जा आणि खाण क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे प्रजोगो पंगेस्टु यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरला आहे. त्यांच्या दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली:
बॅरिटो पॅसिफिक (Barito Pacific): या ऊर्जा कंपनीत त्यांची 71% भागीदारी आहे.
पेट्रिंडो जया क्रियासी (Petrindo Jaya Kreasi): कोळसा आणि सोने व्यवसायाशी संबंधित या कंपनीत त्यांची 84% भागीदारी आहे.
advertisement
MSCI चा रिपोर्ट येताच या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स 12 टक्क्यांनी कोसळले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, पंगेस्टु यांची एकूण संपत्ती आता 31 अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेष म्हणजे, या वर्षात त्यांनी आतापर्यंत एकूण 15 अब्ज डॉलर्स गमावले आहेत. जो खरोखरच एक मोठा आकडा आहे.
2. नक्की काय आहे MSCI चा रिपोर्ट?
या रिपोर्टमध्ये दोन मुख्य मुद्दे मांडण्यात आले आहेत:
advertisement
मालकी हक्कातील गुंतागुंत: कंपन्यांची शेअरहोल्डिंग स्ट्रक्चर (Shareholding Structure) स्पष्ट नाही. कंपनीचा खरा मालक कोण आणि किती शेअर्स कोणाकडे आहेत, यात पारदर्शकता नसल्याचा आरोप झाला आहे.
केंद्रीकृत नियंत्रण: जेव्हा एखाद्या कंपनीचे बहुतांश शेअर्स एकाच व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या हातात असतात, तेव्हा तिथे पारदर्शक व्यापाराचा (Fair Trading) धोका निर्माण होतो. इंडोनेशिया आणि आशियातील अनेक मोठ्या संपत्ती अशाच 'केंद्रीकृत मालकी'मुळे तयार झाल्या आहेत, ज्यावर आता जागतिक संस्थांनी बोट ठेवले आहे.
advertisement

3. गुंतवणूकदारांची भीती आणि 'डोमिनो इफेक्ट'
जेव्हा एखादी जागतिक संस्था एखाद्या देशाच्या नियमांवर किंवा कंपन्यांच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, तेव्हा परदेशी गुंतवणूकदार सावध होतात. त्यांना भीती वाटते की, जर ही रचना चुकीची असेल, तर भविष्यात मोठे घोटाळे होऊ शकतात. याच भीतीपोटी इंडोनेशियाच्या शेअर बाजारातून एकाच दिवसात एकूण 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती हातातून गेली.
advertisement
या घटनेनंतर प्रजोगो पंगेस्टु यांच्या 'फॅमिली ऑफिस'ने एक पत्रक जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आम्ही MSCI च्या कमेंट्सचे आणि अहवालाचे बारकाईने पुनरावलोकन करत आहोत. आम्ही सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत आहे आणि पारदर्शकता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत."
शेअर बाजार हा विश्वास आणि पारदर्शकतेवर चालतो. जेव्हा या विश्वासाला तडा जातो, तेव्हा अब्जाधीशांचे बंगलेही पत्त्यासारखे कोसळतात. प्रजोगो पंगेस्टु यांचे प्रकरण हे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठा धडा आहे की, संपत्ती कितीही मोठी असली तरी ती बाजाराच्या एका झटक्यामुळे कधीही कोसळू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 8:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
8,27,59,50,00,000 रुपये एक झटक्यात गमावले, एका गोष्टीमुळे जगातील श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर, नक्की असं काय घडलं?










