आठवीत शिकणाऱ्या सोहमला शाळेत आला ब्रेन स्ट्रोक, लेकरा वाचवण्यासाठी ड्रायव्हर कुटुंबाची धावधाव, तुम्ही करू शकता मदत!

Last Updated:

कांदिवली परिसरातील 13 वर्षीय सोहम माटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक शाळेतच ब्रेन स्ट्रोक आला.

+
कांदिवलीत

कांदिवलीत १३ वर्षांच्या सोहमला वर्गातच ब्रेन स्ट्रोक; ब्रेन स्ट्रोकशी लढणाऱ्या छोट्या जीवाला मदतीची गरज

मुंबई: कांदिवली परिसरातील 13 वर्षीय सोहम माटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक शाळेतच ब्रेन स्ट्रोक आला. नियमितप्रमाणे वर्गात असताना सोहम अचानक जमिनीवर कोसळला आणि त्याचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. नेमकं काय घडतंय हे शिक्षकांनाही कळत नव्हतं. तत्काळ सोहमची आई शाळेत पोहोचली आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली, सोहमला तीव्र स्वरूपाचा ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करणे आवश्यक होते.
उपचारादरम्यान डॉक्टरांना समजले की, मेंदूला योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नव्हते आणि रक्तप्रवाह मेंदूच्या वरच्या भागात साचत होता. त्यामुळे तातडीचे ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. सोहमच्या मेंदूचा एक भाग तात्पुरता काढून ठेवण्यात आला असून त्याला तब्बल 72 टाके घालण्यात आले आहेत. सध्या तो कांदिवलीतील आरोग्य मॅटरनिटी आणि नर्सिंग होम येथे दाखल असून डॉ. मधुरा कुंभार यांच्या म्हणण्यानुसार सोहमची प्रकृती हळूहळू सुधारत असली तरीही त्याचे मोठे ऑपरेशन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे लाखोंच्या घरात खर्च अपेक्षित आहे.
advertisement
आई गृहिणी, वडील ड्रायव्हर; उपचारांसाठी दागदागिने गहाण
सोहमची आई गृहिणी तर वडील व्यावसायिक ड्रायव्हर आहेत. त्यांना दोघांनाही महिन्याला जेमतेम 10,000 रुपये इतका पगार आहे. कांदिवलीमध्ये भाड्याच्या घरात चार जणांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. सोहमचा चार वर्षांचा धाकटा भाऊ सध्या आजीजवळ राहतो. या कठीण प्रसंगी सोहमच्या पालकांनी सर्व दागदागिने गहाण ठेवत आतापर्यंत तब्बल 8 लाख रुपये उपचारांवर खर्च केले आहेत.
advertisement
मात्र आता येणारे ऑपरेशन, आयसीयू, औषधोपचार आणि पुढील रुग्णालयीन खर्च मिळून साधारण 10 ते 12 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लागणार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत तंग असल्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करत आहेत. ज्यांना सोहमच्या उपचारासाठी मदत करायची आहे, त्यांच्यासाठी कुटुंबाने त्यांचा स्वतःचा यूपीआय आयडी शेअर केला आहे.
advertisement
UPI ID : 9967321902@ybl
सोहमला यापूर्वी कधीही कोणताही आजार नव्हता. तो पूर्णपणे निरोगी, उत्साही, चित्रकलेत आणि डान्समध्ये नेहमी पुढे असणारा विद्यार्थी आहे. अचानक आलेल्या या ब्रेन स्ट्रोकमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसतमुख, खेळकर सोहम एका दिवसात बोलणे, समजणे अशा सर्व गोष्टींपासून दूर गेला आहे. त्याची आई-वडील अजूनही धक्क्यात असून त्याच्या उपचारासाठी लोकांकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आठवीत शिकणाऱ्या सोहमला शाळेत आला ब्रेन स्ट्रोक, लेकरा वाचवण्यासाठी ड्रायव्हर कुटुंबाची धावधाव, तुम्ही करू शकता मदत!
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement