IND vs SA : कामगिरी झिरो तरी त्याचं तिन्ही फॉरमॅटमध्ये सिलेक्शन, पाकिस्ताननंतर आता टीम इंडियातही 'पर्ची क्रिकेट'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर आता टीम इंडिया गुवाहाटीमधील दुसऱ्या टेस्टमध्येही पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.
गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर आता टीम इंडिया गुवाहाटीमधील दुसऱ्या टेस्टमध्येही पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या इनिंगमध्ये 489 रनवर ऑलआऊट झाल्यानंतर भारताचा डाव फक्त 201 रनवर आटोपला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तब्बल 288 रनची आघाडी मिळाली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 26/0 एवढा झाला आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेची आघाडी 314 एवढी झाली आहे.
भारताकडून एकट्या यशस्वी जयस्वालला अर्धशतक करता आलं. जयस्वाल 58 रनची खेळी करून आऊट झाला, तर वॉशिंग्टन सुंदरने 48 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांनी खेळलेल्या शॉटमुळे वाद निर्माण झाला आहे. टीम इंडिया अडचणीत असताना जुरेल आणि पंतने खेळलेल्या शॉटमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. ध्रुव जुरेल शून्य रनवर आणि ऋषभ पंत 7 रन करून आऊट झाला.
advertisement
Got into ODI team after just 7 List A innings.
-Got into Test team after just 15 FC matches.
-Got into T20 team without a single standout IPL season.
-Retained by RR for ₹14 Cr ahead of Buttler, Boult without performance. #dhruvjurel https://t.co/fBuZ2hZ7LQ
— Manvendra Sharma (@Manvendra__17) November 24, 2025
advertisement
जुरेलच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
ध्रुव जुरेलची भारताच्या वनडे टीममध्ये फक्त 7 लिस्ट ए मॅचनंतर निवड झाली. तर टेस्ट टीममध्ये तो फक्त 15 प्रथम श्रेणी सामने खेळून आला. आयपीएलमध्ये एकही धमाकेदार सिझन न खेळता जुरेलची भारताच्या टी-20 टीममध्ये निवड झाली. एवढच नाही तर राजस्थान रॉयल्सने बटलर, बोल्ट यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना सोडून जुरेलला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं. ध्रुव जुरेलला तिन्ही फॉरमॅट आणि आयपीएलमध्ये मिळत असलेल्या या संधीबाबत क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ध्रुव जुरेल पर्ची क्रिकेटर असल्याची टीका क्रिकेट चाहत्यांकडून केला जात आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये पर्ची क्रिकेटरवरून बरेच आरोप झाले होते. वशिलेबाजीवर निवड झालेल्या खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेटमध्ये पर्ची क्रिकेटर म्हणून संबोधित केलं गेलं होतं.
advertisement

टीम इंडियावर नामुष्की
याआधी मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात टीम इंडियाचा 3-0 ने पराभव झाला होता, त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टीम इंडियावर 2-0 ने व्हाईट वॉश होण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्येही टीम इंडिया व्हाईट वॉश झाली तर गौतम गंभीरचं प्रशिक्षकपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
November 24, 2025 4:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : कामगिरी झिरो तरी त्याचं तिन्ही फॉरमॅटमध्ये सिलेक्शन, पाकिस्ताननंतर आता टीम इंडियातही 'पर्ची क्रिकेट'!


