AI तंत्रज्ञानामुळे लोखंडवाला गोळीबार प्रकरणाची मिस्ट्री उलगडली, कमाल आर खान कसा अडकला पिंजऱ्यात?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
CCTV फुटेज उपलब्ध नसतानाही AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलं आहे.
मुंबई : लोखंडवाला परिसरातील नालंदा सोसायटीत घडलेल्या रहस्यमय गोळीबार प्रकरणाचा उलगडा अखेर मुंबई पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात साक्षीदार किंवा स्पष्ट CCTV फुटेज उपलब्ध नसतानाही AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जानेवारी 2026 रोजी नालंदा सोसायटीतील दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळी थेट घरात शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा उपयोगी CCTV फुटेज न मिळाल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं होतं. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी AI आधारित डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, AI च्या मदतीने गोळीचा मार्ग, आवाजाचा स्रोत, गोळीबाराची दिशा तसेच अंतर यांचं डिजिटल रीकन्स्ट्रक्शन करण्यात आलं. या तांत्रिक विश्लेषणातून गोळीबार अभिनेता कमाल आर. खान (KRK) यांच्या घराच्या दिशेकडून झाल्याचं स्पष्ट झालं.
advertisement
कसा गुन्हा उघडकीस आला?
AI प्रणालीने दाखवलेल्या रेंजमध्येच कमाल आर. खान यांचं घर असल्याचं तपासात समोर आलं. याचदरम्यान, खानकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना होती ज्यामुळे तपासाची दिशा अधिक ठोस झाली. यानंतर पोलिसांनी अभिनेता कमाल आर. खान यांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीतून गोळीबार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि अखेर गुन्हा उघडकीस आला.
advertisement
मुंबई पोलिसांचं कौतुक
साक्षीदार आणि CCTV पुरावे नसतानाही डिजिटल फॉरेन्सिक आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हा उकलल्याचं हे एक महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या आधुनिक तांत्रिक तपास क्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कमाल आर खानला न्यायालयीन कोठडी
ओशिवारा गोळीबार प्रकरणात कमाल आर खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ओशिवारा गोळीबार प्रकरणात कमाल आर खानला अटक झाली होती .बंदुकीतून झाडलेली गोळी नालंदा सोसायटीच्या दोन फ्लॅमध्ये शिरल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करत कमाल आर खानला अटक केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 3:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
AI तंत्रज्ञानामुळे लोखंडवाला गोळीबार प्रकरणाची मिस्ट्री उलगडली, कमाल आर खान कसा अडकला पिंजऱ्यात?










