‘गेम ओव्हर’ खरंच झालं, अर्नाळाला हादरवणाऱ्या खुनाचा तपास लागला

Last Updated:

गेम खेळताना झालेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले. मात्र परतफेडीचा तगादा वाढत चालल्याने दीपेशवर मानसिक ताण वाढला.

arnala murder-
arnala murder-
विरार :  अर्नाळा गावाला हादरवून सोडणाऱ्या गोवारी कुटुंबावरील प्राणघातक हल्ल्याचा अखेर उलगडा झाला आहे. या भीषण हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार दीपेश नाईक (वय २९) याला गुन्हे शाखा-३ च्या पथकाने बुधवारी मुंबईतून नाट्यमय पद्धतीने अटक केली. काही दिवसांपासून या घटनेमुळे अर्नाळा परिसरात भीतीचे सावट पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश नाईक हा अर्नाळा बंदरपाडा येथील रहिवासी असून सध्या मुंबईतील एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तो ऑनलाइन गेमिंगच्या नशेत एवढा बुडाला होता की मोठी आर्थिक हानी झाली. गेम खेळताना झालेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले. मात्र परतफेडीचा तगादा वाढत चालल्याने दीपेशवर मानसिक ताण वाढला आणि त्याने चोरीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
याच हेतूने तो काही दिवसांपूर्वी गोवारी कुटुंबाच्या घरात चोरीसाठी शिरला. परंतु चोरीच्या प्रयत्नादरम्यान घरातील सदस्यांनी प्रतिकार केला. अचानक उघडकीस आल्यानंतर घाबरलेल्या दीपेशने संतापाच्या भरात घरातील सदस्यांवर चाकूने वार केले. या घटनेत कुटुंबातील काही सदस्य गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी दीपेश मुंबईला फरार झाला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला. बुधवारी सकाळी मुंबईतील एका ठिकाणी नाट्यमय कारवाई करून पोलिसांनी त्याला अटक केली.
advertisement

ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा वाढता धोका पुन्हा एकदा चर्चेत

तपासादरम्यान उघड झाले की दीपेश हा ऑनलाइन गेमच्या व्यसनात गुंतून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत होता. कर्जाच्या तगाद्याने आणि गेमच्या नशेने त्याचे आयुष्य अंधकारात ढकलले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा वाढता धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
‘गेम ओव्हर’ खरंच झालं, अर्नाळाला हादरवणाऱ्या खुनाचा तपास लागला
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement