BMC Election Exit Poll: विधानसभेला अचूक ठरलेल्या एक्झिट पोलमध्ये ठाकरे ब्रँड 'फेल', इतक्या मिळणार जागा

Last Updated:

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक अचूक म्हणावा किंवा निकालाच्या जवळपास असा अंदाज एक्सिस माय पोलने अंदाज वर्तवला आहे.

News18
News18
मुंबई : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. किरकोळ वाद वगळता मतदान शांतेत पार पडलं आहे. मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आता समोर येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक अचूक म्हणावा किंवा निकालाच्या जवळपास असा अंदाज एक्सिस माय पोलने अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंच्या मराठी महापौर होण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Axis My India ने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंदाज वर्तवला आहे. मुंबई पालिकेत दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्यावर एकत्र आले असले तरी ५८ ते ६८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. शिवसेना आणि मनसेच्या शिवशक्ती युतीला ३२ टक्के मतदान मिळणार असं भाकित Axis My India ने आपल्या पोलमध्ये वर्तवला आहे.
तर त्याच ठिकाणी भाजप आणि शिवसेना महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महायुतीची मतांची टक्केवारी ही ४२ टक्के असणार आहे.
advertisement
तर काँग्रेस-वंचित आघाडीला १२ ते १६ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला १३ टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर इतरांना ६ ते १२ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
मेगा पोलने एक्झिटमध्ये ठाकरे बंधूंना 59 जागा
तर,  नेटवर्क १८ च्या सीएनएन न्यूज मेगा पोलने एक्झिटचा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्तीला ३५ टक्के मतदान मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. या मतदानाच्या टक्केवारीनुसार, ठाकरे बंधूंना ५९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Exit Poll: विधानसभेला अचूक ठरलेल्या एक्झिट पोलमध्ये ठाकरे ब्रँड 'फेल', इतक्या मिळणार जागा
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement