Pune Mahapalika Exit Poll: पुण्यात अजित पवारांना झटका, पुन्हा त्रिमुर्तींकडे सूत्रे, कोणत्या पक्षाला किती जागा? पाहा Exit Poll

Last Updated:

Pune Mahapalika Election Exit Poll 2026: भाजपने विकासच केला नाही, असा थेटपणे आरोप करून ही नुराकुस्ती नाही, असे अजित पवार यांनी थेटपणे दाखवून दिले. पण राष्ट्रवादीची गाडी सत्ता स्थापनेपर्यंतचा प्रवास करणार नाही, असे टीव्ही ९-PRAB केलेला सर्व्हे सांगतो.

News18
News18
पुणे : बृहन्मुंबई महापालिकेनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुण्यात काँटे की टक्कर होत आहे. प्रचारानंतरही दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष दिसून आला. या लढाईत भारतीय जनता पक्ष बाजी मारेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. पुण्याची सूत्रे पुन्हा त्रिमुर्तींकडे जाणार असल्याच्या चर्चांनी अजित पवार यांना मोठा धक्का बसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांनी पुण्याची निवडणूक विशेष गाजली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. पण अजित पवार यांच्या प्रचार सभांनी पुण्यात रंगत आणली. पक्षात मरगळ आल्याचे ओळखून पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. भाजपला थेटपणे अंगावर घेतले. भाजपने विकासच केला नाही, असा थेटपणे आरोप करून ही नुराकुस्ती नाही, असे थेटपणे दाखवून दिले. त्याचा सकारात्मक परिणाम तूर्त झालेला दिसतो, पण राष्ट्रवादीची गाडी सत्ता स्थापनेपर्यंतचा प्रवास करणार नाही, असे टीव्ही ९-PRAB केलेला सर्व्हे सांगतो.
advertisement

पुण्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

पुण्यात भारतीय जनता पक्षाला ९३ जागा, शिवसेना एकनाथ शिंदे यांना ०६ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४३ जागा, शिवसेना ठाकरे गटाला ०७ जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ०८ जागा तर इतरांना दोन ते पाच जागा मिळतील, असा टीव्ही ९-PRAB सर्व्हेचा अंदाज आहे.

एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे सेनेला केवळ एक अंकी जागा मिळणार?

advertisement
एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी लढून त्यांना अजिबातच फायदा झालेला नाही. केवळ एक अंकी संख्येत शिंदेसेनेला समाधान मानावे लागेल, असे दिसते. दुसरीकडे सेना-मनसे एकत्र येऊनही ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळणार नसल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर येते.

पुण्यात किती टक्के मतदान?

पुण्यातील ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी गुरूवारी मतदान संपन्न झाले. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत केवळ ३६ टक्के मतदान झाले. मतदानाचा म्हणावा असा प्रतिसाद लाभलेला नाही. पुणेकर उस्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले नसल्याचे चित्र राहिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Mahapalika Exit Poll: पुण्यात अजित पवारांना झटका, पुन्हा त्रिमुर्तींकडे सूत्रे, कोणत्या पक्षाला किती जागा? पाहा Exit Poll
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement