Mumbai Accident : मुंबईत बस अपघात थांबेना! कुर्ल्यात बेस्ट बसची दुचाकीस्वाराला जोरदार धडक
Last Updated:
Kurla Road Accident : कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसने दुचाकीला धडक दिल्याने 26 वर्षीय तरुण जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा तपास सुरू आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपू्र्वी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर बेस्ट बसचा मोठा अपघात झाला होता ज्यात अनेकांचा मुत्यू झाला होत तर काहीजण गंभीर जखमी झालेले होते. मात्र या घटनेला महिना होत नाही तो पर्यंत कुर्ला परिसरातून बेस्ट बस आणि दुचाकीचा अपघातात झालेला समोर येत आहे.
कुर्ला एलबीएस रोडवर तरुणाचा थरारक अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बस आणि दुचाकीचा अपघात झाले आहे. कुर्ला येथील एलबीएस रोडवर शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात शाहिद शेख (वय 26) हा तरुण जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी शाहिद शेख याला कुर्ला येथील फौजिया रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका अचानक घडल्याने काही काळ एलबीएस रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि बेस्ट बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बेस्ट बस चालक पवनकुमार ओझा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या अपघातानंतर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान अपघाताचे नेमके कारण काय?,बस वेगात होती का? तसेच दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते का? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Accident : मुंबईत बस अपघात थांबेना! कुर्ल्यात बेस्ट बसची दुचाकीस्वाराला जोरदार धडक










