Municipal Election : कुणी तिसरी, तर कुणी नववी शिकलंय, भिवंडीच्या उमेदवारांचे शिक्षण पाहून चक्कर येईल

Last Updated:

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सूरूवात झाली आहे. या निवडणुकीत 23 प्रभागातील 90 जागांवर 1033 उमेदवार रिंगणात आहेत.

bhiwandi election
bhiwandi election
Bhiwandi Nizampur Municipal Election 2026 : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सूरूवात झाली आहे. या निवडणुकीत 23 प्रभागातील 90 जागांवर 1033 उमेदवार रिंगणात आहेत. या दरम्यान प्रत्येक नागरिकाला त्याच्या वॉर्डमधील उमेदवार कोण आहे? किती शिकलेला? सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार की नाही? असे अनेक प्रश्न असतात. अशात आता भिवंडीमधून काही उमेदवारींची माहिती समोर आली आहेत. त्यात काही उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत, तर काही उमेदवार हे अवघे तिसरी किंवा नववी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलेले आहेत.
advertisement
भिवंडी शहराचा विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही उमेदवार इंजिनियर तर काही वकील आहेत. तर या निवडणुकीत पुन्हा मैदानात उतरणारे काही उमेदवार हे दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. यातले काही जण तर तिसरी ते बारावीपर्यंत शिकलेले आहेत.
भिवंडीमधील रिषिका रांका, श्रीकांत कामुर्ती आणि मयुरेश पाटील हे वकील आहेत.तर निलेश चौधरी, संजय म्हात्रे, सुमीत पाटील, श्याम अग्रवाल,यशवंत टावरे हे पदवीधर आहेत.राहुल पाटील हे इंजिनियर आहेत. तर इतर उमेदवार हे तिसरी ते नववी पर्यंत शिकलेले आहेत.
advertisement
भिवंडीतील भाजपचे बिनविरोध उमेदवार
प्रभाग क्रमांक 18 अ- अश्विनी फुटाणकर
प्रभाक क्रमांक 18 ब - दीपा दीपक मढवी
प्रभाक क्रमांक 18 क- अबूसूद अशफाक अहमद शेख
प्रभाक क्रमांक 16 अ- परेश चौघुले
advertisement
प्रभाग क्रमांक 23 ब- भारती हनुमान चौधरी
प्रभाग क्रमांक 17 - सुमित पाटील, (केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पुतण्या)
भिवंडी महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती (SC) 3 जागा त्यापैकी 2 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) 1 सर्वसाधारण ST जागा आरक्षित आहे. मागासवर्ग प्रवर्ग (OBC) 24 जागा आहेत.त्यातील 12 जागा OBC महिला यांच्यासाठी राखीव असणार आहे. सर्वसाधारण (Open) - 62 जागा, त्यातील 31 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत.
advertisement
भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसने 47 जागा मिळवणून काँग्रेसने बहुमत संपादन केलं होतं. तर भाजपने 20,शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी 4, समाजवादीचा पक्षाला 2 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळवले होते. त्याबदल्यात काँग्रेसने शिवसेनेला उप महापौरपद ही दिले होते. त्यामुळे भाजप आणि कोणार्क महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर रहावे लागले होते.
advertisement
भिवंडी महानगरपालिकेचा 2017 चा पक्षनिहाय निकाल
एकूण जागा 90
काँग्रेस 47
भाजप 19
शिवसेना 12
समाजवादी पक्ष 2
कोणार्क आघाडी 4
इतर 10
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Election : कुणी तिसरी, तर कुणी नववी शिकलंय, भिवंडीच्या उमेदवारांचे शिक्षण पाहून चक्कर येईल
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement