Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?

Last Updated:

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून पाच महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात येणार आहे. या विमानतळाच्या सुरूवातीमुळे प्रवाशांना मोठी सोय होणार असून प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?
नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच हा विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार असून पहिल्या टप्प्यात पाच मोठ्या शहरांना जोडला जाणार आहे. यात नेमक्या कोणत्या शहरांचा समावेश असेल ते जाणून घेऊयात.
'या' शहरांचा असणार समावेश
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीकडून नवी मुंबई विमानतळावरून दररोज दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून 15 पेक्षा जास्त शहरांसाठी 20 फ्लाइट्स दररोज ऑपरेट केल्या जाणार आहेत. आगामी काळात म्हणजेच 2026 पर्यंत या संख्येत वाढ करून एकूण 55 फ्लाइट्स चालवल्या जातील, ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन हब ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
advertisement
याशिवाय इंडिगो आणि अकासा एअर या दोन प्रमुख विमान कंपन्याही नवी मुंबई विमानतळावरून सेवा देणार आहेत. इंडिगो कंपनीने मोठा निर्णय घेतला असून ती या विमानतळावरून 36 देशांतर्गत गंतव्यस्थानांसाठी उड्डाणे सुरू करणार आहे. सुरुवातीला 15 शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे आणि एकूण 158 उड्डाणे चालवली जाणार आहेत. त्यापैकी 14 फ्लाइट्स आंतरराष्ट्रीय मार्गांवरून उड्डाण करतील.
advertisement
प्रवाशांना होणार दुहेरी फायदा
दरम्यान अकासा एअर देखील आपल्या ऑपरेशनचा विस्तार करत आहे. या कंपनीकडून दररोज 40 उड्डाणांची योजना असून त्यामध्ये 8 ते 10 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स असतील. यामुळे प्रवाशांना देशांतर्गतच नव्हे तर परदेश प्रवासासाठीही अधिक सुविधा मिळणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement