Maharashtra Election 2024 : लोढांची संपत्ती झाली कमी, तर आदित्य ठाकरे अन् जितेंद्र आव्हाडांची संपत्ती इतक्या कोटींनी वाढली

Last Updated:

राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी भाजपकडून अर्ज दाखल केला.

News18
News18
मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय धुराळा सुरू आहे. पक्षांकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केलीय. राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी भाजपकडून अर्ज दाखल केला. यात त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. मंगलप्रभात लोढा यांनी त्यांची संपत्ती जवळपास ४३७ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलंय.
मलबार हिल मतदारसंघाचे आमदार असलेल्या आणि सध्या पर्यटन मंत्री असणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी त्यांची संपत्ती ४३६ कोटी ८० लाख ५९१ इतकी असल्याचं सांगितलंय. यात जंगम मालमत्ता १२३ कोटी ३९ लाख रुपये इतकी आहे. तर स्थावर मालमत्ता १२५ कोटी ५४ लाख रुपयांची आहे. मंगल प्रभात लोढा यांच्यावर जवळपास १८२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेअर्स, सोने यातील गुंतवणूक जवळपास ११ कोटी रुपये इतकी आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचं समोर आलंय. २०१९ च्या निवडणुकीत लोढा यांनी त्यांची संपत्ती ४४१ कोटींपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं होतं.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिलीय. आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात चार कोटींची वाढ झालीय. सध्या आदित्य ठाकरे यांची संपत्ती २१ कोटी ४७ लाख ५४ हजार ४१० रुपये इतकी असल्याचं सांगितलंय. यात १.४८ कोटी रुपयांची जमीन रायगडमध्ये आहे.
advertisement
आदित्य ठाकरे यांच्यावर ४३ लाख ७६ हजार २१२ रुपयांचं कर्ज आहे. त्यांची चल संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे तर अचल संपत्ती ७ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची आहे. त्यांच्याकडे ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे वाहन असून ६४ लाखांचे सोने असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आदित्य ठाकरे यांची २०१९ मध्ये संपत्ती १९ कोटी ५ लाख रुपये इतकी होती.
advertisement
मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:ची आणि पत्नीची संपत्ती जाहीर केलीय. यात गेल्या पाच वर्षात पाच कोटींची वाढ झाल्याचं दिसून येतंय. २०१९ मध्ये जितेंद्र आव्हाड यांची संपत्ती ४७ कोटी रुपये इतकी होती तर आता ५३ कोटी इतकी संपत्ती आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जंगम मालमत्ता जवळपास १४ कोटींची आहे. तर २८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३७ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Election 2024 : लोढांची संपत्ती झाली कमी, तर आदित्य ठाकरे अन् जितेंद्र आव्हाडांची संपत्ती इतक्या कोटींनी वाढली
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement