मुंबईमध्ये बुधवारी शाळा बंद, पण... अभ्यास करावा लागणार! पालकांनो आताच जाणून घ्या मोठी अपडेट

Last Updated:

मुंबईसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरूवार 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीसाठी शाळांबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये बुधवारी शाळा बंद, पण... अभ्यास करावा लागणार! पालकांनो आताच जाणून घ्या मोठी अपडेट
मुंबईमध्ये बुधवारी शाळा बंद, पण... अभ्यास करावा लागणार! पालकांनो आताच जाणून घ्या मोठी अपडेट
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरूवार 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईमधल्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी आणि मतमोजणीच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा ताब्यात घेतल्या जाणार आहेत, या कारणामुळे बुधवारी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या बंद असतील, पण शाळा ऑनलाईन माध्यमातून घेतल्या जातील.
दुसरीकडे 15 जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, म्हणून बुधवारी शाळा ऑनलाईन पद्धतीने होतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये बऱ्याच शाळा या मतदान केंद्र आहेत, तर काही मुख्य शाळांच्या शेजारीच मतमोजणी केंद्र ठेवण्यात आल्या आहेत. 15 तारखेला मतदान पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईमध्ये बुधवारी शाळा बंद, पण... अभ्यास करावा लागणार! पालकांनो आताच जाणून घ्या मोठी अपडेट
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement