'BMC फॅमिली बिझनेस नाही',भाजप आमदार संतापले; थेट फडणवीसांना पत्र; कारण काय?

Last Updated:

निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी घराणेशाहीला झुकतं माप दिलंय

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई :   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार
आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीली सुरुवात केली आहे.  महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापल्या विभागात राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी घराणेशाहीला झुकतं माप दिलंय. त्यामुळ निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांच्या नात्यागोत्याचा गोतावळा उमेदवार यादीत पाहायला मिळत आहे. फक्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सगळ्या पक्षातच घरणेशाही पाहायला मिळत आहे. आता ही घराणेशाही संपुष्ठात येण्यात भाजप आमदारानेच पुढाकार घेतला आहे. या संदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
advertisement
बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ‘माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या तिकीटासाठी आग्रह करणार नाही’ असा पत्रात उल्लेख केला आहे. लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी स्वतःच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांसाठी तिकीट मिळविण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचा उल्लेख उपाध्यय यांनी आपल्या पत्रात केला आहे. काम करणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी मिळायला हवी, अशीही भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
advertisement

असक्रिय व्यक्तींना तिकीटासाठी आग्रह

BMC IS NOT A FAMILY BUSINESS असं वक्तव्य मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केल्यानंतर मुंबई भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी त्यांना पत्र लिहित नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना तिकीट न देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आमदार संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहित स्वतःपासून याची सुरूवात केली आह अनेक नेते, पदाधिकारी घरातील असक्रिय व्यक्तींना तिकीटासाठी आग्रह धरत असल्याचे कळवले आहे.
advertisement

नेमकं काय लिहिलंय पत्रात?

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी च्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. मुंबईत महायुतीचा महापौर निवडून येण्यासाठी संघटित काम करणे गरजेचे आहे. सध्या राजकीय वातावरण चांगले आहे तसेच 2029 मध्ये विधानसभेत महिला आरक्षण लागू होणार म्हणून जबाबदार जनप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी स्वतःच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यासाठी तिकीट मिळवण्यास प्रयत्न करीत आहे. समाजात चुकीचा संदेश जाईल असे मला वाटते.  मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या तिकीटासाठी आग्रह करणार नाही. पक्षात अनेक वर्ष काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे व ती जिंकून येईल व सक्षम महिला नेतृत्व मुंबईला भेटेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'BMC फॅमिली बिझनेस नाही',भाजप आमदार संतापले; थेट फडणवीसांना पत्र; कारण काय?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement