Team India : गिलला टीमबाहेर करण्यामागे कोण? आगरकरने हात झटकले, कॅमेरासमोर नावच घेतलं!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या काही काळापासून बॅटिंगमध्ये संघर्ष करणाऱ्या शुभमन गिलला वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे.

गिलला टीमबाहेर करण्यामागे कोण? आगरकरने हात झटकले, कॅमेरासमोर नावच घेतलं!
गिलला टीमबाहेर करण्यामागे कोण? आगरकरने हात झटकले, कॅमेरासमोर नावच घेतलं!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या काही काळापासून बॅटिंगमध्ये संघर्ष करणाऱ्या शुभमन गिलला वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये गिल 4, 0 आणि 28 रनवर आऊट झाला. या खराब कामगिरीनंतर गिलला वर्ल्ड कपसाठीच्या टीममधून बाहेर करण्यात आलं. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी गिलला टीमबाहेर करण्याचं कारण सांगितलं आहे.
'तो किती चांगला खेळाडू आहे, हे आम्हाला माहिती आहे, पण सध्या त्याच्या बॅटमधून तेवढ्या रन येत नाहीयेत. तो मागच्या टी-20 वर्ल्ड कप टीममधूनही बाहेर होता, कारण आम्ही वेगळ्या टीम कॉम्बिनेशनसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. खेळाडूंची निवड करताना टीम कॉम्बिनेशनकडे लक्ष द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही 15 खेळाडूंची निवड करता, तेव्हा कुणाला ना कुणाला बाहेर ठेवावं लागतं, त्यामुळे यावेळी गिलला बाहेर जावं लागलं आहे', अशी प्रतिक्रिया अजित आगरकरने दिली आहे.
advertisement

गिल कुणामुळे बाहेर?

गिलला टीमबाहेर करण्यामागे टीम मॅनेजमेंटची भूमिका असल्याचं आगरकर अप्रत्यक्षपणे म्हणाला आहे. टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये एक्स्ट्रा विकेट कीपर हवा होता, त्यामुळे एका बॅट्समनची जागा द्यावी लागली, असं आगरकर म्हणाला आहे.

इशान किशनचं कमबॅक

टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेट कीपर हवा होता. इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला प्राथमिकता दिली गेल्याचं आगरकर म्हणाला आहे. तर जितेश शर्मा खालच्या क्रमांकावर बॅटिंग करतो, त्यामुळे त्यालाही टीमबाहेर जावं लागलं आहे. 'आम्ही टीम कॉम्बिनेशन बघत होतो. आम्हाला असा विकेट कीपर हवा होता, जो वरच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो. जितेशने काहीही चूक केलेली नाही, पण टीम कॉम्बिनेशन आणि टॉप ऑर्डरमध्ये विकेट कीपर हवा असल्यामुळे जितेशला संधी मिळाली नाही', अशी प्रतिक्रिया आगरकरने दिली आहे.
advertisement

काय म्हणाला कॅप्टन?

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही गिलला टीमबाहेर करण्याचं कारण सांगितलं आहे. 'टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर आम्ही श्रीलंकेला गेलो होतो, तेव्हा काही सामन्यांमध्ये आम्ही 200 पेक्षा जास्त रन केल्या होत्या, गिल तेव्हा टीममध्ये होता. आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेट कीपर आणि खाली रिंकू किंवा वॉशिंग्टन सुंदर हवा होता, त्यामुळे वरती एक एक्स्ट्रा विकेट कीपर ठेवावा लागला. गिलच्या फॉर्मचा काही विषय नव्हता', असं वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने केलं आहे.
advertisement
सूर्यकुमार यादवने त्याच्या खराब फॉर्मवरही भाष्य केलं आहे. यावर्षी सूर्यकुमार यादवची कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्याची सरासरी फक्त 15 च्या आसपास आहे. 'मला माहिती आहे, मला काय करायचं आहे आणि मी तेच करणार आहे. तुम्हाला सूर्यकुमार यादव बॅट्समन म्हणून दिसेल. हा खराब काळ थोडा जास्त सुरू आहे, पण याआधीही बऱ्याच खेळाडूंनी कमबॅक केला आहे', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली. 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.
advertisement

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गिलला टीमबाहेर करण्यामागे कोण? आगरकरने हात झटकले, कॅमेरासमोर नावच घेतलं!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement