विठूरायांच्या भक्तांवर साखर झोपेतच काळाचा घाला; प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
वारीसाठी निघालेल्या भक्तांच्या बसचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई, प्रमोद पाटील, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य रात्री एकच्या सुमारास मुबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली, नीलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबई पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून बसमध्ये 54 प्रवाशी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 49 जणांवर उपचार सुरू आहे. जखमींपैकी 7 ते 8 जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमी भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, 49 जण जखमी झाल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. सर्व प्रवाशी डोंबिवली निळजे येथील असल्याची माहिती समोर आली असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2024 6:53 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
विठूरायांच्या भक्तांवर साखर झोपेतच काळाचा घाला; प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू