Mumbai Nagpur Railway: दिवाळीत गर्दी वाढली, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-नागपूर जादा फेऱ्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Nagpur Railway: मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई: दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मुंबई ते नागपूर जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दरम्यान सहा जादा फेऱ्या चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुणे ते नागपूर दरम्यान बारा विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
advertisement
दरम्यान, विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून गाडी क्रमांक 01011 ही सीएसएमटी – नागपूर विशेष गाडी मध्यरात्री 12.20 वाजता रवाना होईल. तर त्याच दिवशी नागपुरात दुपारी 4.05 वाजता पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01012 नागपूरहून रात्री 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.05 वाजता मुंबईत पोहोचेल.
थांबे कुठे?
view commentsया गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा आदी स्थानकांवर थांबे असतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Nagpur Railway: दिवाळीत गर्दी वाढली, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-नागपूर जादा फेऱ्या, पाहा वेळापत्रक


