Ganesh Chaturthi : गणपतीला गावी जायचं, गाडी स्वस्त की बस? पेट्रोल- CNG साठी किती येईल खर्च

Last Updated:

Ganesh Chaturthi : तुम्ही चारपाच जण मिळून गाडी करून जाणं फायद्याचं ठरू शकतं का? मुंबई ते गोवा किती खर्च होऊ शकतो जाणून घेऊया. 

कार की बस काय स्वस्त?
कार की बस काय स्वस्त?
मुंबई : गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी अचानक ट्रेन बूकिंग होणं कठीण असतं. तसंच ट्रेनचं बूकिंग फुल्ल झाल्यानं तिकिट मिळत नाही. तर एसटी बसेस वेळेत नसतात आणि खासगी बसेस अव्वाच्या सव्वा दर आकारतात. अशावेळी चार-पाच जण मिळून चारचाकीने जाण्याचाही पर्याय असतो. पण असं जाणं इतर पर्यायांच्या तुलनेत फायद्याचं असतं का? मुंबई ते गोवा प्रवास करायचा झाला तर किती खर्च होतो?
आजही सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे हे अगदी खरं आहे. पेट्रोलच्या तुलनेत CNG गाड्या जास्त मायलेजही देतात. त्यामुळे सहाजिकच लोक CNG कडे वळत आहेत. मात्र तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकूणच किंमत आणि प्रवास किंवा मायलेजचा विचार न करता सारासार विचार करण्याची गरज आहे.
जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि CNG कार घ्यायची की पेट्रोल कार घ्यायची या भ्रमात असाल तर आधी दोन्ही कारचे फायदे आणि तोटे जाणून घ्या. आता सीएनजीची किंमत पेट्रोलपेक्षा कमी नाही आणि सीएनजी कारची किंमत पेट्रोल कारपेक्षा 1 ते 1.30 लाख रुपये जास्त आहे. पेट्रोल कार चांगली की सीएनजी कार? या प्रश्नाचे उत्तर येथे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
advertisement
मुंबईत ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजला जर 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ लिटर पेट्रोल लागेल. 106 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 106 म्हणजे तुम्हाला एकूण 3169.4 लीटर पेट्रोल लागेल.
advertisement
तेच तुम्ही CNG कार घेण्याचा विचार करत आहात, तर मुंबई ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक किलो CNG मध्ये 30 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजसाठी जर 1 किलो CNG लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ किलो CNG लागेल. 87 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 87 म्हणजे तुम्हाला एकूण 1734 रुपयांचा CNG लागले.
advertisement
विचार केला तर तुम्हाला जवळपास 1400 रुपयांचा पेट्रोल आणि CNG मध्ये फरक पडतो. आता एकूण टक्केवारीचा विचार करायचा तर 44 टक्क्यांचा फरक या दोघांमध्ये पडतो. आता तुम्ही गणपतीला जर गावी जायचा विचार करत असाल तर आयत्यावेळी तुम्ही तिकीट काढलं किंवा बसने जरी जायचं म्हटलं तरी तिकीट साधारण 1000 रुपये लागणारच आहे. मग तुम्ही ह्या पर्यायाचा देखील विचार करु शकता.
मराठी बातम्या/मुंबई/
Ganesh Chaturthi : गणपतीला गावी जायचं, गाडी स्वस्त की बस? पेट्रोल- CNG साठी किती येईल खर्च
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement