Navi Mumbai : एका सेकंदाची चूक अन् आयुष्यभराचं दुःख,पण डॉक्टरांनी फिरवलं नशिबाचं चक्र, नेमकं काय घडलं?
Last Updated:
Ulwe Construction Site Accident : उलवे हे नवी मुंबईतील एक शहर असून याच शहरातील एका सुरु असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटवर एक विचित्र पण तितकाच धक्कादायक अपघात घडलेला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील उलवे परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम सुरू असताना भीषण अपघात झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला.तिथं असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमी कामगाराला मदत दिली.
उलव्यात कामगाराचा पाय यंत्रात चिरडला
कन्स्ट्रक्शन साईटवरच्या अपघातात मोहन थापा या कामगाराचा पाय ग्राइंडर मशीनमुळे अचानक कापला गेला. काम सुरू असताना मशीनवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला आणि सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मोहन थापा यांना स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ उलवे येथील विश 2 केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच कोणताही वेळ न लावता उपचारांना सुरुवात करण्यात आली.
advertisement
रुग्णालयाचे सीईओ डॉ. शुभम पाठक, डॉ. महावीर आणि त्यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोल्डन अवरचा योग्य वापर केला. रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवत तातडीने शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अत्यंत कठिण असूनही डॉक्टरांच्या टीमने मोठ्या कौशल्याने ती पार पाडली.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या कामगाराला डॉक्टरांनी दिलं बळ
सुमारे दोन तास चाललेल्या या अवघड शस्त्रक्रियेनंतर कापलेला पाय पुन्हा यशस्वीरीत्या जोडण्यात डॉक्टरांना यश मिळाले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे मोहन थापा यांचा पाय वाचू शकला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वेळेवर उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 8:23 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : एका सेकंदाची चूक अन् आयुष्यभराचं दुःख,पण डॉक्टरांनी फिरवलं नशिबाचं चक्र, नेमकं काय घडलं?










