ऑफिसची कटकट संपली, आता रेल्वे स्टेशनवर बसून करता येणार काम, मुंबई सेंट्रलला वेगळाच पॅटर्न!

Last Updated:

Mumbai Central: मुंबईकरांसाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पहिलाच प्रकल्प मुंबई सेंट्रलला होत असून आता स्टेशनवर बसून ऑफिसचं काम करता येणार आहे.

ऑफिसची कटकट संपली, आता रेल्वे स्टेशनवर बसून करता येणार काम, मुंबई सेंट्रला वेगळाच पॅटर्न!
ऑफिसची कटकट संपली, आता रेल्वे स्टेशनवर बसून करता येणार काम, मुंबई सेंट्रला वेगळाच पॅटर्न!
मुंबई: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी विमानतळासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात येत असलेल्या या ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत हे लाउंज प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. देशातील पहिल्या डिजिटल लाउंज या स्वरूपातील ही सुविधा मुंबईत सुरू होत असल्याने त्याकडे व्यापक पातळीवर अपेक्षेने पाहिले जात आहे.
जानेवारी महिन्यात मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज म्हणजेच विश्रामगृह कम को-वर्किंग स्पेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने मुंबई सेंट्रल स्टेशनवर हा उपक्रम राबवला जात आहे. सुमारे 2.71 कोटी रुपये खर्चातून आणि 1,712 चौरस फूट क्षेत्रफळात हे लाउंज उभारले जात आहे. प्रवाशांना ट्रेनची वाट पाहताना काम करता यावे ऑफिसची मिटिंग अटेंड करता यावी किंवा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत जागा मिळावी या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरू केला जात आहे.
advertisement
सध्या स्टेशनवर प्रवाशांना सामान्य प्रतीक्षालय किंवा शुल्क घेणाऱ्या एक्झिक्युटिव्ह लाउंजचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र तिथे ऑफिस किंवा कॉलेजचे काम आरामात करता येत नाही. नवीन डिजिटल लाउंजमध्ये मात्र मोफत वीज, आरामदायक खुर्ची-टेबल, उच्चगती वायफाय, पुरेसे प्लग पॉइंट्स आणि कॅफे सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे ट्रेनची वाट पाहताना हॉटेल किंवा कॅफेमध्ये काम करण्याची गरज राहणार नाही.
advertisement
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “डिजिटल लाउंज ही सुविधा सुरू झाल्यानंतर व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांना स्टेशनवर काम करणे अधिक सोयीचे होईल.” रेल्वे प्रशासनानेही दरवर्षी सुमारे 50 लाख रुपयांचे उत्पन्न या लाउंजमधून मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
ही सुविधा फक्त प्रवाशांसाठीच नाही तर मुंबईतील नागरिक, फ्रीलान्सर आणि वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी यांनाही उपयुक्त ठरणार आहे. घरी योग्य वातावरण किंवा इंटरनेटची सुविधा नसल्याने अनेक जण कॅफेमध्ये काम करतात अशांसाठी ही जागा उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. खाद्यपदार्थांची दुकानेही सुरू होणार असल्याने कोणालाही खाण्यापिण्याची अडचण भासणार नाही.
advertisement
मुंबई सेंट्रल स्टेशनवरील हे डिजिटल लाउंज उभारले गेल्यानंतर रेल्वे स्टेशन ही केवळ प्रवासाची जागा न राहता, कामासाठीही आकर्षक आणि आधुनिक पर्याय ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ऑफिसची कटकट संपली, आता रेल्वे स्टेशनवर बसून करता येणार काम, मुंबई सेंट्रलला वेगळाच पॅटर्न!
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

View All
advertisement