कांदिवलीत डीपीरोड ठरतोय धोकादायक; दुचाकी थेट घुसली घरात, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- Published by:Sayali Zarad
 
Last Updated:
कांदिवलीत डीपीरोड धोकादायक ठरत आहे. या धोकादायक रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजय वंजारा, मुंबई, 29 ऑगस्ट : कांदिवलीत डीपीरोड धोकादायक ठरत आहे. या धोकादायक रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये रोडवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराची गाडी थेट नागरिकाच्या घरात घुसली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
कांदिवली पुर्वकडील लोखंडवाला- ठाकूर व्हिलेजला जोडणाऱ्या 120 फूटी विकास नियोजन रस्ता डिपी रोडवरील वाहने सध्या सिंग इस्टेटमधील रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. सोमवारी सायकाळी 6 वाजेच्या दरम्यान या रोडवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने थेट नागरिकाच्या घरात दुचाकी घुसविण्याचा प्रकार घडला. सुदैवाने ही भरधाव दुचाकी घराच्या भिंतीला आदळल्यानं मोठी जिवितहानी टळली. अन्यथा घरातील नागरिकांचा नाहक बळी गेला असता. या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी बिल्डर, पालिका आणि लोकप्रतिनिधीविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
advertisement
कांदिवलीत डीपीरोड ठरतोय धोकादायक; दुचाकी थेट घुसली घरात, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद#Mumbai #news18marathi pic.twitter.com/91PhIlopOP
— News18Lokmat (@News18lokmat) August 29, 2023
डीपीरोडवरील 120 फूटी रोड हा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून निघालेला आहे. तो सुरु करण्यासाठी पालिका आर. दक्षिण विभाग आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जुलै महिन्यामध्ये महिंद्रा कंपनीची संरक्षण भिंत तोडली होती. तेव्हापासून या रस्त्याहून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांची वर्दळ वाढलेली आहे. डीपी रोड समोरील घरांसह रोड नं. 2 मधील घरांना आणि लहान मुले, वयोवृध्दांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या वाढत्या वाहनांमुळे यासर्वांची सुरक्षा धोक्यात आली असून याकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्यानं भविष्यात या दुर्घटनेमुळे नागरिकांचा नाहक बळी जावू शकतो, अशी भीती स्थानिक रहिवासी सचिन नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
डीपी रोड नागरिकांसाठी खुला तर केला, मात्र या रोडच्या समोरील सुमारे 350 घरे ही बाधित आहेत. या बाधित झोपडीधारकांना पर्यायी घरे कधी, कुठे देणार याचे कुठलेही पालिका आर. दक्षिण विभाग आणि लोकप्रतिनिधीकडे नियोजन नाही, मात्र तो खुला करून सिंग इस्टेटमधील नागरिकांच्या जीवांशी खेळले जात असून त्यांच्या जखमांवर मिठ चोळले जात असल्याची खंत स्थानिक रहिवासी अमर पन्हाळकर यांनी व्यक्त केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2023 1:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कांदिवलीत डीपीरोड ठरतोय धोकादायक; दुचाकी थेट घुसली घरात, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद


