Air India : फक्त 1200 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी! तिकीट बूक करण्यासाठी उरले फक्त काही दिवस; वाचा नेमका प्लॅन
Last Updated:
Air India Express Offer : फक्त काही रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची अनोखी संधी मिळत आहे. एअर इंडियाच्या या खास ऑफरमध्ये प्रवासी कमी किंमतीत तिकीट बुक करून देशभर सहज प्रवास करू शकतात.
एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरू केली आहे. कंपनीने नुकताच 'पे डे सेल' जाहीर केली असून या सेलमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी तिकीटांवर मोठी सूट मिळणार आहे. देशांतर्गत तिकिटांची किंमत फक्त एक हजार दोनशे रुपयांपासून सुरू होते तर आंतरराष्ट्रीय तिकिटे 3,724 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
ऑफर किती दिवसांसाठी मर्यादित...?
एअर इंडियाची ही ऑफर 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रवाशांसाठी आहे. तिकीट बुकिंगची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. प्रवाशांनी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 'FLYAIX' हा प्रोमो कोड वापरणे आवश्यक आहे.
देशांतर्गत प्रवासासाठी 'Xpress Lite' श्रेणीत तिकिटे 1,200 रुपयांपासून सुरू होतात, यामध्ये चेक-इन बॅगेजची सुविधा नाही. 'Xpress Value' श्रेणीत 1,300 रुपयांपासून तिकिटे उपलब्ध असून यात काही अतिरिक्त सुविधा मिळतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 'लाइट' श्रेणीची तिकिटे 3,724 रुपयांपासून आणि 'व्हॅल्यू' श्रेणीची तिकिटे 4,674 रुपयांपासून आहेत.
advertisement
💸 PayDay just got better! ✈️
Grab Xpress Lite fares starting from ₹1200 on domestic routes and ₹3724 on international routes.
📅 Book by 1 Oct and travel from 12 Oct till 30 Nov 2025.
Book our PayDay deals from 28 Sep across all channels, and unlock early access with… pic.twitter.com/MdVaIUkI0m
— Air India Express (@AirIndiaX) September 26, 2025
advertisement
">http://
💸 PayDay just got better! ✈️
Grab Xpress Lite fares starting from ₹1200 on domestic routes and ₹3724 on international routes.
📅 Book by 1 Oct and travel from 12 Oct till 30 Nov 2025.
Book our PayDay deals from 28 Sep across all channels, and unlock early access with… pic.twitter.com/MdVaIUkI0m
— Air India Express (@AirIndiaX) September 26, 2025
advertisement
विशेष म्हणजे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक केल्यास कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. चेक-इन बॅगेजच्या बाबतीतही विशेष सवलत आहे. देशांतर्गत प्रवासासाठी 15 किलोपर्यंत बॅगेज फक्त 1,500 रुपयांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 20 किलोपर्यंत बॅगेज 2,500 रुपयांमध्ये दिले जाते, जे सामान्य दरांपेक्षा खूप कमी आहेत.
बिझनेस क्लास प्रवाशांसाठी 20% सूट, अधिक लेगरूम, मोफत गरम जेवण, प्राधान्याने बोर्डिंग आणि बॅगेज सेवा मिळेल. एअरलाइनच्या 40 पेक्षा जास्त नवीन बोईंग 737-8 विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, सशस्त्र दलातील सदस्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीही खास सवलती आहेत.
advertisement
एअर इंडिया एक्सप्रेसने EMI आणि ‘Buy Now, Pay Later’ पेमेंट सुविधा सुरू केल्या आहेत. मास्टरकार्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तिकीट खरेदी केल्यास देशांतर्गत बुकिंगवर 250 रुपयांची आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगवर 600 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. याशिवाय दिल्ली आणि बंगळुरूहून उदयपूर आणि जोधपूरसाठी थेट उड्डाणे सुरू झाली आहेत, जे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत. ही ऑफर प्रवाशांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Air India : फक्त 1200 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी! तिकीट बूक करण्यासाठी उरले फक्त काही दिवस; वाचा नेमका प्लॅन