'गाडीवर फिरायला चल', विकृताने भररस्त्यात शाळकरी मुलीला मारली मिठी, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Last Updated:

मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारुच्या नशेत व्यक्तीनं शाळकरी मुलीला मिठी मारली, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी सुनावली आहे.

News18
News18
मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीनं दारुच्या नशेत शाळकरी मुलीला मिठी मारली. या प्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एका शाळकरी मुलीसोबत भर रस्त्यात अशाप्रकारे वर्तन केल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर पोलिसांनी पोक्सो कलमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी सकाळी भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. घटनेच्या दिवशी मंगळवारी ती आपल्या काही मैत्रिणींसह थांबली होती. यावेळी इथं एक व्यक्ती आला. त्याने अश्लील शेरेबाजी केली. तसेच पीडित मुलीला गाडीवर फिरायला चल, असं म्हणत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केलं. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्ती करत तिला मिठी मारली.
advertisement
हा सगळा प्रकार पाहून पीडित मुलीसह तिच्या मैत्रिणी घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काहीजणांनी हस्तक्षेप करत आरोपीला पकडलं. संबंधित प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला चोप देत त्याला मालवणी पोलिसांच्या हवाली केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अर्थात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'गाडीवर फिरायला चल', विकृताने भररस्त्यात शाळकरी मुलीला मारली मिठी, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement