कबुतरखाना प्रकरणात मोठा ट्विस्ट! जैन समाज BMC निवडणूक लढवणार, राजकीय पक्षाची घोषणा, पक्षचिन्ह ठरलं

Last Updated:

BMC निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीसोबत जैन समाजाचा शांतीदूत जनकल्याण पार्टी प्रवेश, कबुतरखान्यावरून वाद, कैवल्यरत्न महाराजांची वादग्रस्त विधाने.

BMC निवडणूक लढवण्यावरुन महायुतीमध्ये सध्या धुसफूस चालू असताना आता आणखी एक प्रतिस्पर्धी तयार झाला आहे. BMC साठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सोबत जैन समाज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समुदायाने थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. जैनमुनी कैवल्यरत्न महाराज यांनी मुंबईतील धर्मसभेत 'शांतीदूत जनकल्याण पार्टी' नावाच्या नव्या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा केली.
कबुतर खान्यावरुन वाद सुरू आहे. कबुतरांमुळे श्वसनाचा त्रास होत असल्याने तो बंद करावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना जैन समाजाकडून मात्र आंदोलन सुरू होते. आता त्यांनी थेट BMC निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. जैनमुनी कैवल्यरत्न महाराज यांनी स्पष्ट केले की, त्यांची ही नवी पार्टी आगामी महापालिका निवडणूक लढवणार आहे. या पक्षाचे चिन्ह काय असेल, हे सांगताना ते म्हणाले, "कबुतर हेच आमचे चिन्ह असेल." कबुतरखान्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
advertisement
यावेळी जैनमुनींनी जैन समाजाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "जैन समाज हा शांतीप्रिय समाज आहे. तसेच, सर्वात जास्त कर (Tax) भरणारा हा जैन समाज आहे." यावेळी जैनमुनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून राजकीय नेत्यांना आवरण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे, तुमच्या नेत्यांना आवरा." कबुतरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आता जैन समुदायाने राजकारणाचा मार्ग स्वीकारला असून, या नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे मुंबईच्या राजकारणात नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
जैन समुदायाच्या धर्मसभेत जैनमुनींनी वादग्रस्त विधान केलं आहे. एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? मी डॉक्टरांना मूर्ख मानतो असं म्हणत जैनमुनींनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचबरोबर कबुतराच्या विष्ठेमुळे गृह कलह संपतात. कबुतराची विष्ठा किडनी आजार ठिक करते असा अजब दावा जैन मुनींनी केला आहे. तर जैन मुनीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले आहेत असंही जैन मुनी म्हणालेत... दरम्यान मंगलप्रभात लोढा धर्मसभेला आले नाहीत ही सरकारची मिलीभगत आहे असंही जैन मुनी म्हणाले आहेत. तर कबुतरांच्या विष्ठा खाल्ल्यानं किडनीचा आजार बरा होतो, असा जावई शोधही या मुनींनी लावला. या सर्व विधानामुळे आता नवा वाद पेटला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
कबुतरखाना प्रकरणात मोठा ट्विस्ट! जैन समाज BMC निवडणूक लढवणार, राजकीय पक्षाची घोषणा, पक्षचिन्ह ठरलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement