Mumbai Local Train : खुशखबर! उपनगरीय रेल्वे मार्गावर18 डब्ब्यांची एसी लोकल; कधी धावणार, कुठे थांबणार?
Last Updated:
18 Coach AC Local Train : पश्चिम रेल्वेवर 18 डब्यांच्या एसी लोकलची पहिली प्रायोगिक चाचणी घेण्यात येणार आहे. भविष्यात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन हा प्रयोग केला जात आहे.
मुंबई : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकलचा प्रवास अधिक आरामदायी आणि गर्दीमुक्त करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ महत्त्वाचा प्रयोग करत आहे. पहिल्यांदाच 18 डब्यांच्या एसी लोकल ट्रेनची चाचणी पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गावर 14 आणि 15 जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'असा' असेल बदल
18 डब्यांच्या एसी लोकलमध्ये तीन-फेज प्रोपल्शन सिस्टीम असणार आहे. चाचणीदरम्यान ट्रेनची आपत्कालीन ब्रेकिंग क्षमता, कप्लर फोर्स, सुरक्षितता आणि एकूण कामगिरी यासारख्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, बॉम्बार्डियर कंपनीने तयार केलेल्या रॅकची चाचणी ताशी 110 किमी वेगाने होणार असून मेधा इलेक्ट्रिक्सने बनवलेल्या रॅकची चाचणी ताशी 105किमी वेगाने घेण्यात येणार आहे. चाचणीपूर्वी सर्व डबे आवश्यक अपग्रेडेशन करून सज्ज केले जाणार आहेत.
advertisement
सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये 12 आणि काही ठिकाणी 15 डब्यांच्या लोकल धावत आहेत. मात्र भविष्यात वाढणारी प्रवासी गर्दी आणि सुरू असलेली पायाभूत कामे लक्षात घेता 18 डब्यांच्या लोकलचा पर्याय विचारात घेतला जात आहे. यामध्ये एसी लोकलचाही समावेश असेल.
कधी सुरु होणार 18 डब्ब्यांची एसी लोकल
view commentsरेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही चाचणी पूर्णपणे प्रायोगिक असून सध्या लगेच 18 डब्यांची एसी लोकल सुरू केली जाणार नाही. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्चून 2,856 कोच खरेदी करण्याची योजना आहे. भविष्यात पायाभूत सुविधा सक्षम झाल्यानंतर 15 किंवा 18 डब्यांची एसी लोकल सुरु होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 12:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Train : खुशखबर! उपनगरीय रेल्वे मार्गावर18 डब्ब्यांची एसी लोकल; कधी धावणार, कुठे थांबणार?











