जानेवारीमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी उरलेयत फक्त 5 शुभ मुहूर्त, एक तर खूपच खास; पाहा तारखा!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नवीन वर्षाची सुरुवात झाली की अनेकजण नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करून आपल्या प्रवासाची शुभ सुरुवात करण्याचा विचार करतात. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात वाहन खरेदी करताना शुभ मुहूर्त पाहण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Vehicle Purchase Muhurta : नवीन वर्षाची सुरुवात झाली की अनेकजण नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करून आपल्या प्रवासाची शुभ सुरुवात करण्याचा विचार करतात. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात वाहन खरेदी करताना शुभ मुहूर्त पाहण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की, शुभ नक्षत्रावर खरेदी केलेले वाहन केवळ सुखकर प्रवासच देत नाही, तर कुटुंबासाठी प्रगती आणि सुरक्षितताही घेऊन येते. जानेवारी 2026 चा पहिला आठवडा संपला असून, आता या महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये वाहन खरेदीसाठी केवळ 5 मुख्य मुहूर्त शिल्लक आहेत. जर तुम्हीही या महिन्यात नवीन वाहन घरी आणण्याचा बेत आखत असाल, तर खालील तारखा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जानेवारी 2026: वाहन खरेदीचे शुभ मुहूर्त आणि वेळा
ज्योतिषीय गणनानुसार, चित्रा, स्वाती, अनुराधा आणि मृगशिरा ही नक्षत्रे वाहन खरेदीसाठी अत्यंत फलदायी मानली जातात. या महिन्यात उपलब्ध असलेले 5 मुहूर्त.
तारीख वार शुभ वेळ नक्षत्र
11 जानेवारी रविवार सकाळी 07:15 ते सकाळी 10:20 पर्यंत चित्रा
12 जानेवारी सोमवार दुपारी 12:42 ते रात्री 09:05 पर्यंत स्वाती
advertisement
14 जानेवारी बुधवार सकाळी 07:15 ते संध्याकाळी 05:52 पर्यंत अनुराधा
21 जानेवारी बुधवार सकाळी 07:14 ते 22 जाने. पहाटे 02:47 पर्यंत धनिष्ठा, शतभिषा
29 जानेवारी गुरुवार सकाळी 07:11 ते दुपारी 01:55 पर्यंत मृगशिरा
नक्षत्रांचा प्रभाव: वाहन खरेदीसाठी 'मृगशिरा', 'रेवती', 'चित्रा' आणि 'अनुराधा' ही नक्षत्रे सर्वात उत्तम मानली जातात. 29 जानेवारी रोजी मृगशिरा नक्षत्र असल्याने हा दिवस या महिन्यातील सर्वात शक्तिशाली मुहूर्तांपैकी एक आहे.
advertisement
राहुकाळ टाळा: वाहन खरेदीची वेळ निश्चित करताना त्या दिवशीचा 'राहुकाळ' आवर्जून तपासावा. राहुकाळात नवीन वस्तूंची खरेदी किंवा व्यवहार करणे अशुभ मानले जाते. वर दिलेले मुहूर्त राहुकाळ सोडून काढलेले असले तरी, स्थानिक पंचांगानुसार खात्री करून घेणे सोयीचे ठरते.
14 जानेवारी - मकर संक्रांतीचा विशेष योग: 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. अनुराधा नक्षत्रासह हा दिवस वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी नवीन वाहन आणल्याने घरामध्ये सकारात्मकता येते.
advertisement
रंगांची निवड: तुमच्या राशीनुसार वाहनाचा रंग निवडल्यास ते अधिक फलदायी ठरते. उदाहरणार्थ, मेष आणि वृश्चिक राशीसाठी पांढरा किंवा लाल रंग, तर कुंभ आणि मकर राशीसाठी निळा किंवा करडा रंग शुभ मानला जातो.
21 जानेवारीचा दीर्घ मुहूर्त: ज्यांना रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी उशिरा डिलिव्हरी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी 21 जानेवारीचा मुहूर्त सर्वोत्तम आहे, कारण हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत उपलब्ध आहे.
advertisement
वाहन पुजा: वाहन शोरूममधून बाहेर काढल्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन त्याची विधिवत पूजा करावी. वाहनावर स्वस्तिक काढणे आणि लिंबू चिरडणे यांसारख्या परंपरा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 12:32 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
जानेवारीमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी उरलेयत फक्त 5 शुभ मुहूर्त, एक तर खूपच खास; पाहा तारखा!











