आता वाहतूक कोंडीत अडकायचं नाही, मुंबईत वर्दळीच्या रस्त्यावर नवा पूल, वेळ वाचणार, अंतर घटणार!
Last Updated:
Madh-Versova Bridge Project : मढ-वर्सोवा खाडीवर नवीन पूल उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबई : मुंबईतील मढ-वर्सोवा रस्त्यावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीवर आता तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. मढ ते वर्सोवा दरम्यानच्या खाडीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे. सध्या या प्रकल्पाअंतर्गत प्राथमिक सर्वेक्षण तसेच माती परीक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.
मढ-वर्सोवा रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालकांना अनेकदा तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. विशेषतहा ऑफिसच्या वेळा आणि सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पुलासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नुकतीच कोस्टल रेग्युलेटरी झोन कडूनही अंतिम परवानगी मिळाली आहे. सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुलाचा आराखडा अंतिम केला असून बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. हा पूल सुरु झाल्यानंतर मढ-वर्सोवा परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आता वाहतूक कोंडीत अडकायचं नाही, मुंबईत वर्दळीच्या रस्त्यावर नवा पूल, वेळ वाचणार, अंतर घटणार!










