Maharashtra Elections 2024 : पक्ष फुटीनंतरही निष्ठा दाखवली, मात्र ठाकरेंनी त्यांच्याच उमेदवारीवर सस्पेन्स वाढवला!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections 2024 : एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना ठाकरे यांनी पुन्हा संधी दिली आहे. मात्र, एका आमदाराच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढवला आहे.

पक्ष फुटीनंतरही निष्ठा दाखवली, मात्र ठाकरेंनी त्यांच्याच उमेदवारीवर सस्पेन्स वाढवला!
पक्ष फुटीनंतरही निष्ठा दाखवली, मात्र ठाकरेंनी त्यांच्याच उमेदवारीवर सस्पेन्स वाढवला!
मुंबई :  शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत अपेक्षेनुसार काही नावांचा समावेश करण्यात आला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनीदेखील ठाकरेंची साथ सोडली. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना ठाकरे यांनी पुन्हा संधी दिली आहे. मात्र, एका आमदाराच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढवला आहे.
शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी शिवसेनेने अनेक ठिकाणी जिंकण्याच्या निकषावर पक्ष प्रवेश देत काहींना उमेदवारी जाहीर केली.

विधीमंडळ गटनेत्याचे नावच नाही....

बुधवारी, ठाकरे गटाने आपली 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. पण, त्यात पक्ष फुटीनंतर विधीमंडळात पक्षाचे गटनेते असणारे अजय चौधरी यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे शिवडी मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांचे नाव सध्या चर्चेत आहे.
advertisement

कोणाचे नाव आघाडीवर?

काही दिवसांपूर्वी सुधीर साळवी यांची मातोश्रीवर बैठकही झाली होती. त्यानंतर अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. सुधीर साळवी यांचे नाव आघाडीवर आहे. लालबाग-शिवडी-परळ हा भाग गिरणगावातील भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शिंदे गट-भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंना या भागातून चांगला उमेदवार देण्याचे आव्हान आहे. यामुळेच ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत बालेकिल्ला असलेल्या भागातील उमेदवाराचे नाव नव्हते, अशी चर्चा आहे.
advertisement
सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून लालबाग आणि परिसरातील सामाजिक कार्यात चांगलेच सक्रिय आहेत. त्याशिवाय, त्यांनी लोकसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अजय चौधरी यांची जुने शिवसैनिक म्हणून परिसरात ओळख आहे. दगडूदादा सकपाळ यांच्यानंतर त्यांना आमदारकीसाठी उभे करण्यात आले, त्यात ते विजयी झाले. शिवसेना फुटल्यानंतही त्यांनी ठाकरेंना साथ दिली. उद्धव यांनी त्यांना विधीमंडळ पक्षाचे गटनेतेपद दिले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 : पक्ष फुटीनंतरही निष्ठा दाखवली, मात्र ठाकरेंनी त्यांच्याच उमेदवारीवर सस्पेन्स वाढवला!
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement