Maharashtra Elections 2024 : आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचा उमेदवार ठरला! मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात भाजपने आपला उमेदवार निश्चित केला असल्याचे चित्र आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त महिनाभराचा कालावधी उरला आहे. तर, दुसरीकडे अजूनही सत्ताधारी, विरोधकांनी आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले नाहीत. तर, दुसरीकडे काही जागांवर पक्षांनी आपल्या उमेदवारांना प्रचार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात भाजपने आपला उमेदवार निश्चित केला असल्याचे चित्र आहे. हायप्रोफाइल मतदारसंघाच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महायुतीकडून येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्याासाठी कंबर कसण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतीकडून शायना एन सी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शायना एन सी यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर आता शायना एन सी या वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. शायना एन सी यांनी वरळी मतदारसंघातील सर्व महापालिका वॅार्डातील मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्व समाजाच्या मतदारांशी शायना एन सी यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शायना एनी सी यांनी आज वरळी मतदारसंघातील काही ठिकाणी मतदारांची भेट घेतली.
advertisement
वरळीतून आदित्य यांना आव्हान?
मागील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांच्या आधी सुनील शिंदे हे आमदार होते. वरळी विधानसभा हा मतदारसंघ संमिश्र वस्तीचा असला तरी मागील काही वर्षामध्ये उच्चभ्रू मतदारांचा टक्का वाढत आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती, अल्पसंख्याक वर्गाचेही निर्णायक मतदार आहे. तर, दुसरीकडे भाजपने शायना एन सी यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी देखील वरळी मतदारसंघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांनी वरळी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. त्याशिवाय, काही कार्यक्रमही आयोजित केले. त्यामुळे आता या मतदारसंघातील निवडणुकीचे आव्हान आदित्य ठाकरे पेलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
कोण आहेत शायना एन सी?
शायना एन सी या फॅशन डिझायनर असून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. 2004 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. शायना एन सी यांचे वडील नाना चुडासामा हे मुंबईचे शेरीफ (नगरपाल) होते. गुजरात दंगलीवरून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली होती. शायना एन सी या एक स्वयंसेवी संस्थाही चालवतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 20, 2024 1:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 : आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचा उमेदवार ठरला! मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात







