यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट, विदर्भाला यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
वातवरणातील बदलामुळे पावसासाठी पुरक वातावरण निर्माण होत आहे. यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्यात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, वातवरणातील बदलामुळे पावसासाठी पुरक वातावरण निर्माण होत आहे. यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट आहे. अनेक जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे थंडीचा जोर देखील हळूहळू वाढत आहे. पाहुयात पुढील 24 तासांसाठी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत दुपारनंतर उकाडा जाणवेल. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
पुण्यात एकीकडे गुलाबी थंडीचा जोर वाढेल तर दुसरीकडे जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात उद्या 27 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील नागपूरमध्ये उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली,जालना, छ. संभाजीनगरमध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ऑक्टोबर हिट देखील जाणवेल अस हवामान विभागाने म्हटलंय. उद्या छ. संभाजीनगरमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
राज्यातून परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. मात्र, वातवरणातील बदलामुळे पावसासाठी पुरक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. एकीकडे पावसाची हजेरी लागत आहे तर दुसरीकडे थंडीचा जोर देखील हळूहळू वाढत आहे. त्यामुळे पाऊस आणि थंडी असे दुहेरी सावट यंदाच्या दिवाळीवर निर्माण झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 29, 2024 7:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट, विदर्भाला यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती?