Maharastra Politics : महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कॅबिनेटला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
DYCM absent in cabinate meeting : कॅबिनेट बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. कालच्या महापालिकेच्या निकालानंतर आता दोन्ही मुख्यमंत्री नाराज आहेत की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
Maharastra Politics : राज्यातील महापालिका निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं असून भाजपच मोठा भाऊ ठरला. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकेत भारतीय जनता पक्षाने भगवा फडकवला आहे. अशातच आता महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार सध्या बारामतीमध्ये आहेत तर एकनाथ शिंदे ठाण्यातच आहेत. अशातच मुंबईमध्ये येण्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाक मुरडली आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज?
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंत्री महोदय बिझी असल्याने राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक उशिरा आज पार पडली. मात्र, या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. कालच्या महापालिकेच्या निकालानंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. मुंबई सोडती तर इतर ठिकाणी शिवसेनेला धक्का बसल्याचं पहायला मिळालं. भाजपमुळे शिवसेनेला नवी मुंबईसह इतर ठिकाणी देखील फटका बसलाय. अशातच आता मुंबईतील एका घटनेमुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
अजित पवार बारामतीमध्ये आहेत. तिथं एका प्रदर्शनात अजित पवार व्यस्थ आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नगरसेवक फुटू नयेत यासाठी हॉटेल पॉलिटिक्समध्ये व्यस्थ आहेत. अशातच आता दोन्ही उपमुख्यमंत्री व्यस्थ असल्याने कॅबिनेटला अनुपस्थित असल्याचं बोललं जातंय.
कॅबिनेट बैठकीपूर्वी अध्यक्षपदाची शपथ
दरम्यान, कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वल्सा नायर सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ दिली व यशस्वी कार्यकाळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 1:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharastra Politics : महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कॅबिनेटला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!









