Mumbai: मुंबई उच्च न्यायालयासमोर भयानक घडलं, 80 हजारांसाठी इसमाने पेटवून घेतलं, वकिलाबद्दल पत्र समोर
- Published by:Sachin S
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास आझाद मैदान पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलं. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केलं आहे. उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयासमोर आज सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश सावंत असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. प्रकाश सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. पण, वेळीच तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी धाव घेतली आणि प्रकाश सावंत यांना वाचवलं.
पण, तोपर्यंत प्रकाश सावंत हे ५०-६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी त्यांना ताातडीने जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून स्वतःला जाळून घेतलं असल्याचं समोर आलं आहे. प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास आझाद मैदान पोलिसांकडून सुरू आहे. प्रकाश सावंत यांनी आत्मदहनाच्या आधी एक नोट लिहिली होती.
advertisement
प्रकाश सावंत यांनी नोटमध्ये काय लिहिलं?
कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार आणि वकील स्नेहा हरणे... कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार जवळ ५ ते ६ वेळा हक्कसोड लिहून घेतले, त्याबद्दल कित्येक तक्रारी केल्या. तरी त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यानंतर वकिल स्नेहा हरणे यांना सन २०२१ रोजी रु. ६,८०,०००/- इतकी रक्कम या केससाठी दिलेली आहेत, मात्र त्या सदरची रक्कम परत करत नाहीत. त्यासाठी प्रकाश सावंत, बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथं वकील स्नेहा हरणे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती.
advertisement
त्यावेळी जोशी साहेब जज्ज होते. त्यांनी सुद्धा वकिल स्नेहा हरणे यांना वॉर्निंग दिली होती आणि सांगितलं होतं की, प्रकाश सावंत यांचे सगळे रुपये आणि व्याजासह द्यावे. तरी स्नेहा हरणे वकील यांनी फक्त रुपये ६,००,०००/- इतकी रक्कम परत केली आहे आणि रुपये ८०,०००/- व्याज अजूनही देत नाहीत.
याबाबतची तक्रार बार कॉऊन्सील येथील रणपिसे सर यांच्याकडे १०/१०/२०२३ रोजीपासून ५ ते ६ वेळा केली आहे. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यानंतर याबाबतची तक्रार दिल्ली मंत्रालय इथं सुद्धा ५ वेळा तक्रार केली आहे, दिल्ली मंत्रालय यांनी कणकवली पोलिसांना या विषयी सुचित केलं आहे. मात्र तरीही कणकवली पोलीस याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.
advertisement
राज्य सरकार आणि दिल्ली मंत्रालय येथे मी अनेक वेळा तक्रार दिली. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे आमची जागा कणकवली सरकार यांनी घेतली आहे. जर या जागा मोबदला आम्हाला न मिळाल्यास कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास -आमची कोणतीही जबाबदार नसेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबई उच्च न्यायालयासमोर भयानक घडलं, 80 हजारांसाठी इसमाने पेटवून घेतलं, वकिलाबद्दल पत्र समोर










